Online Shopping Bad Experience : ऑनलाईन शॉपिंग करणं आजकाल अनेकांची सवय बनली आहे. कारण मोबाइलमधील अॅपच्या माध्यमातून सहजपणे शॉपिंग करता येते. याकडे लोकांचा कल अधिक असतो कारण कमी किंमतीत चांगल्या वस्तू, कपडे मिळतात. एका अंदाजानुसार, कपड्यांची ऑनलाइन खरेदी अधिक केली जाते. बरं असं नाही की, यात फसवणूक होत नाही. अनेकदा लोकांची मोठी फसवणूक होते आणि त्याच्या घटनाही समोर येत असतात. ऑनलाइन शॉपिंग करणं कधी कधी त्वचेसाठी सुद्धा नुकसानकारक ठरतं. यासंबंधी एक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील 27 वर्षीय मॉली मे वॉटसननं स्वस्तात ऑनलाइन शेपवेअरची खरेदी केली आणि त्यामुळे तिच्या त्वचेचं मोठं नुकसान झालं.
पार्टीची तयारी आणि वेदनादायी अनुभव
मॉली मे न मे 2024 मध्ये एका शॉपिंग वेबसाइटवरून केवळ 1 हजार रूपयांमध्ये शेपवेअरची खरेदी केला. जे तिला तिच्या बहिणीच्या बेबी शॉवर पार्टीमध्ये ड्रेसखाली घालायचं होतं. पण 27 जुलैला पार्टीदरम्यान अचानक तिच्या मांड्या आणि कंबरेजवळ जळजळ जाणवली. जणू कपड्यांच्या आत एखाद्या मधमाशीनं दंश मारला असेल.
त्वचेवर गंभीर इजा
पार्टी सोडून मॉली टॉयलेटमध्ये गेली आणि चेक केलं तर शेपवेअरचं इलास्टेन मटेरिअल वितळलं होतं आणि त्वचेवर चिकटलं होतं. ज्यामुळे वेदनाही होत होत्या. मॉली घाबरली होती आणि त्यामुळे तिने ते त्वचेवर चिकटलेलं खेचून काढलं. त्यामुळे त्वचेवर आणखी जास्त इजा झाली. डॉक्टरांनुसार, तिच्या त्वचेचं आधीच गंभीर नुकसान झालं होतं. इजा इतकी गंभीर होती की, तिला पार्टी सोडून घरी परतावं लागलं.
दुसऱ्या दिवशी मॉली लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये गेली. इथे डॉक्टरांनी सांगितलं की, त्वचेवर झालेली इजा इतकी गंभीर होती की, त्याचे डाग नेहमीसाठी राहू शकतात. तिच्यावर लगेच उपचार करण्यात आले आणि पायांवर पट्टी बांधण्यात आली. पुढे मॉलीनं या घटनेबाबत वेबसाइटकडे तक्रार केली. पण त्यांच्याकडून फारच निराशाजनक रिप्लाय आला कंपनीनं केवळ 10 डॉलरचं कूपन रिफंड ऑफर केलं. जे मॉलीनं नाकारलं आणि या ब्रॅन्डचे कपडे कधीही खरेदी करणार नाही असं सांगितलं.