Join us

अरे त्यांना पॅराशूट द्या..! लग्नात वडिलांसोबत लेकीनं घेतली रॉयल एंट्री, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:27 IST

Brides wedding entry with her father : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही वधू आणि तिचे वडील एका मोठ्या झुंबरात लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना पाहू शकता.

आजकाल विवाहसोहळा ही स्पर्धा बनली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पूर्वीची लग्नपद्धती खूपच साधी असायची. आता त्याची जागा मोठ्या समारंभांनी घेतली आहे. लग्नात हौसमौज करण्यात कोणतीही कसर ठेवली जात नाही. आता, लग्नाच्या ठिकाणी वधूच्या प्रवेशाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.  हा धोकादायक स्टंट  पाहताना नेटिझन्स चिंतेत होते. (Brides wedding entry with her father is raising concerns watch video to know the reason)

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही वधू आणि तिचे वडील एका मोठ्या झुंबरात लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना पाहू शकता. झुंबर आपोआप वर सरकत राहिल्याने दोघेही मधेच उभे राहिले. लग्नातील पाहुण्यांनी स्टाईलमध्ये आलेल्या वधूकडे पाहिले आणि चित्तथरारक क्षणाची छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिक केले.

शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढतील ६ पदार्थ, रोज खा; पोटावरची चरबी झरझर होईल कमी

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला.  “त्यांना सुरक्षितता गियर किंवा पॅराशूट द्या,” अशी कमेंट एका वापरकर्त्यानं केली. आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर १ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज या व्हिडिओला मिळाले आहेत.  

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल