lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > बाबौ! नवरा राहिला बाजूला अन् शेरवानी घालून नवरीच घोड्यावर चढली: समानतेचा संदेश पाहून लोक म्हणाले...

बाबौ! नवरा राहिला बाजूला अन् शेरवानी घालून नवरीच घोड्यावर चढली: समानतेचा संदेश पाहून लोक म्हणाले...

Bride wears sherwani and rides a horse : पारंपारिक प्रथांना कलाटणी देत ही नवरी शेरवानी घालून घोड्यावर बसली आहे. हा फोटो पाहून नेटीझन्स आश्चर्यचकीत झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:22 PM2021-12-06T13:22:07+5:302021-12-06T13:49:54+5:30

Bride wears sherwani and rides a horse : पारंपारिक प्रथांना कलाटणी देत ही नवरी शेरवानी घालून घोड्यावर बसली आहे. हा फोटो पाहून नेटीझन्स आश्चर्यचकीत झाले आहेत.

Bride wears sherwani and rides a horse : Bride wears sherwani and rides a horse on wedding day | बाबौ! नवरा राहिला बाजूला अन् शेरवानी घालून नवरीच घोड्यावर चढली: समानतेचा संदेश पाहून लोक म्हणाले...

बाबौ! नवरा राहिला बाजूला अन् शेरवानी घालून नवरीच घोड्यावर चढली: समानतेचा संदेश पाहून लोक म्हणाले...

लग्न म्हणलं की घोड्यावरची वरात आलीच. आतापर्यंत तुम्ही घोड्यावर शेरवानी घातलेला नवरा मुलगा प्रत्येक लग्नात पाहिला असेल. सध्या सोशल मीडियावर आगळ्या वेगळ्या नवरीचा फोटो व्हायरल होत आहे.  पारंपारिक प्रथांना कलाटणी देत ही नवरी शेरवानी घालून घोड्यावर बसली आहे. हा फोटो पाहून नेटीझन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. (Bride wears sherwani and rides a horse on wedding day)

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील रनोली गावात ही अनोखी घटना घडली. (Ranoli village in Rajasthan’s Sikar district ) गावातील लोकांनी लग्नाआधीच्या 'बंदोरी' विधीसाठी घोड्यावर स्वार झालेली वधू पाहिली. कृतिका सैनी असे या वधूचे नाव असून लग्नाआधी तिच्या कुटुंबीयांनी तिला लिंग समानतेचा संदेश देण्यासाठी वराप्रमाणे बंदोरी (Bandori) विधी करायला लावले. मुली आणि मुलांमध्ये कधीही भेद करू नये आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून द्यावी, असा संदेश या कुटुंबाला द्यायचा होता.

भास्कर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री कृतिकाची बंदोरी सीकरमध्ये काढण्यात आली. प्रथा परंपरा मोडून, ​​कृतिका वराप्रमाणेच शेरवानी आणि पगडी घालून वरातीत सहभागी झाली. विशेष म्हणजे या नवरीनं घातलेली शेरवानी तिनं तिच्या हातानं बनवली आहे. 

वधूचे वडील महावीर सैनी यांनी या असामान्य कृतीबद्दल सांगितले की, त्यांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे वाढवले ​​आहे. मुलाप्रमाणेच आपल्या मुलीच्या लग्नाची मिरवणूक काढण्याची त्याची नेहमीच इच्छा होती. त्यांनी असेही सांगितले की वराने त्यांच्या लग्न समारंभात 1 लाख रुपये 'शगुन' रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. लग्नाआधीच्या विधीनंतर कृतिकाने १ डिसेंबरला मनीष सैनीसोबत लग्नगाठ बांधली.

 

वधू आणि वर दोघेही सुशिक्षित आहेत. कृतिकाने जयपूरमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे, तर वर  व्यवसायाने अकाउंटंट आहे. कृतिकाने सुमारे ७ वर्षे स्काऊटमध्येही सेवा बजावली असून त्यासाठी तिला राज्य आणि जिल्हा स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कुटुंबात सर्वात लहान असलेल्या कृतिकाला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.

 

वधूने सर्व रूढींना कलाटणी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी, नेहा खिचर नावाच्या राजस्थानातील वधूनेही शेरवानी परिधान करून 'बंदोरी' नावाच्या लग्नाआधीच्या विधीसाठी घोड्यावर स्वार झाली. ती IIT पदवीधर होती आणि मथुरा रिफायनरीत इंडियन ऑइलमध्ये अधिकारी म्हणून काम करत होती.

Web Title: Bride wears sherwani and rides a horse : Bride wears sherwani and rides a horse on wedding day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.