lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > नवरीची कमाल एन्ट्री... गाडीच्या बॉनेटवर बसून केला ढिण्चॅक डान्स, व्हायरल व्हिडिओ

नवरीची कमाल एन्ट्री... गाडीच्या बॉनेटवर बसून केला ढिण्चॅक डान्स, व्हायरल व्हिडिओ

Social viral: स्वत:चं लग्न कसं स्पेशल करता येईल, यासाठी सध्या अनेक लोकांची धडपड सुरू असते.. आता याच नवरीचं बघा ना.. तिचा हा मंडपातल्या एन्ट्रीचा (entry of a bride) व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 04:57 PM2022-01-29T16:57:04+5:302022-01-29T16:57:47+5:30

Social viral: स्वत:चं लग्न कसं स्पेशल करता येईल, यासाठी सध्या अनेक लोकांची धडपड सुरू असते.. आता याच नवरीचं बघा ना.. तिचा हा मंडपातल्या एन्ट्रीचा (entry of a bride) व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...

Bride is dancing on the bonnet of a car, video is viral | नवरीची कमाल एन्ट्री... गाडीच्या बॉनेटवर बसून केला ढिण्चॅक डान्स, व्हायरल व्हिडिओ

नवरीची कमाल एन्ट्री... गाडीच्या बॉनेटवर बसून केला ढिण्चॅक डान्स, व्हायरल व्हिडिओ

Highlightsगाडीच्या बॉनेटवर बसून डान्स करणाऱ्या या नवरीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे...

सध्या लग्नसराईत एक भलताच भारी ट्रेण्ड सुरू आहे... यामध्ये नवरदेव- नवरी आपलं लग्न कसं हटके पद्धतीने होईल, याची खास तयारी करताना दिसतात... प्रत्येकालाच स्वत:च्या लग्नात काहीतरी असं वेगळं करायचं आहे, जे आतापर्यंत कुणीच पाहिलेलं नसावं.. म्हणूनच तर सध्या लग्नाचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) चांगलेच व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ बघताना जाम मजादेखील येते.. आता हेच बघा ना... गाडीच्या बॉनेटवर बसून डान्स करणाऱ्या या नवरीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे...

 

नवरा आणि नवरीने लग्न मंडपात कशी एन्ट्री घ्यावी, याचंही आजकाल खास प्लॅनिंग करण्यात येतं.. कुणी जेसीबी घेऊन येतं तर कुणी मोटर सायकलवर बसून येतं.. असे काय- काय नविन ट्रेण्ड हल्ली येत आहेत.. आपली या व्हिडिओमधली जी नवरी आहे, तिनेही तिच्या लग्न मंडपात अशीच भन्नाट एन्ट्री घेतली आहे. तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या witty_wedding या पेजवर शेअर करण्यात आला आहे. Arriving in style… ❤️My Swagger bride अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे...

 

या व्हिडिओमध्ये असं आहे की लग्नमंडपाच्या दारात एक कार उभी असून नवरी या कारच्या बॉनेटवर बसलेली आहे. तिच्या दोन्ही बाजूंनी तिचे नातलग, मित्रमंडळी उभे आहेत. मागे एक छान ढिण्चॅक गाणं लागलं आहे आणि गाणं ऐकून ही नवरी गाडीच्या बॉनेटवर बसूनच नाचायला लागली आहे.. तिच्या सोबत तिच्या अवतीभोवती असणारे वऱ्हाडीही नाचत असून सगळ्यांचाच डान्स बघण्यासारखा झाला आहे. या नवरीने गॉगल लावला असून तिचा स्वॅग (swag of a bride) कमालीचा देखणा आहे.. 


 

Web Title: Bride is dancing on the bonnet of a car, video is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.