Join us

मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:27 IST

Breast Milk Flavored Ice Cream : ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर आईस्क्रीम लोकप्रिय झालं आहे. ज्याची चव आईच्या दुधासारखीच आहे. या नव्या फ्लेव्हरची इंटरनेटवर खूप चर्चा रंगली आहे.

मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या फ्लेव्हर्सचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. व्हॅनिला, चॉकलेट, स्ट्रॉबेरीसारखे फ्लेव्हर्स आपण नेहमीच खातो पण आता एक हटके फ्लेव्हर सर्वाचंच लक्ष वेधून घेत आहे. अमेरिकेत ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर आईस्क्रीम लोकप्रिय झालं आहे. ज्याची चव आईच्या दुधासारखीच आहे. या नव्या फ्लेव्हरची इंटरनेटवर खूप चर्चा रंगली आहे. दोन अमेरिकन कंपन्यांनी मिळून हा आईस्क्रीम फ्लेव्हर तयार केला आहे. एका कंपनीचं नाव Frida आहे जी पॅरेंटिंगशी संबंधित प्रोडक्ट बनवते. दुसऱ्या कंपनीचं नाव Odd Fellows Ice Cream Company आहे जी आईस्क्रीम बनवते.

फ्रिडा आणि ऑड फेलोज आईस्क्रीम या दोन्ही कंपन्यांनी हे आईस्क्रीम बनवण्यासाठी एकत्र काम करत आहे. कंपनीचा दावा आहे की, त्याची चव अगदी आईच्या दुधासारखीच आहे. कंपनीने इन्स्टाग्रामवर एक प्रमोशनल पोस्ट देखील केली आहे ज्यामध्ये दुधाचा टँकर ट्रक दिसतो. टँकरवर 'ब्रेस्ट मिल्क आईस्क्रीम' लिहिलेलं आहे. ही पोस्ट इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, या आईस्क्रीमचा फ्लेव्हर फक्त आईच्या दुधासारखा आहे. परंतु प्रत्यक्षात त्यात असं काहीही नाही. फ्रिडाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हे आईस्क्रीम बनवण्यासाठी अनेक गोष्टी वापरल्या गेल्या आहेत. दूध, हेवी क्रीम, स्किम मिल्क पावडर, डेक्स्ट्रोज, इन्वर्टेड शुगर, सॉल्टेड कॅरमल फ्लेव्हर, मध, पदार्थांसाठी वापरला जाणारा पिवळा रंगाचा यामध्ये समावेश आहे. तसेच अनेक एडिबल केमिकल्स आणि गोष्टी आहेत ज्यामुळे ज्याची चव आईच्या दुधासारखीच आहे. 

कंपनी आपल्या जाहिरातीत म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही हे आईस्क्रीम खाता तेव्हा तुम्हाला तुमचं बालपण नक्की आठवेल. विशेषत: जेव्हा तुम्ही आईचं दूध प्यायचात तो काळ आठवेल. यामुळेच लोक हे आईस्क्रीम आवडीने खात आहेत. कंपनीने याचं लिमिटेड प्रोडक्शन केलं आहे. कंपनीच्या मते, ते खाल्ल्यावर तुम्हाला थोडे गोड, थोडे खारट, स्मूथ आणि हलकी मधासारखी चव लागेल. फ्रिडाच्या वेबसाईटवरून याची खरेदी करता येईल.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया