Join us

हृदयस्पर्शी! शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या पोराची मदतनीस मावशींनी 'अशी' केली पाठवणी, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:02 IST

Boy receiving farewell from his house help :

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात काही इमोशनल असतात तर काही व्हिडिओ खूप हसवतात.  सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनं नेटिझन्सना वेड लावलं आहे. शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांना कामवाल्या मावशीनं तिच्या घरी बोलावलं.  त्यानंतर ते केलं ते वाचून तुम्हीही भावूक व्हाल. अनेक सख्ख्या नात्यांपेक्षा मानलेल्या नात्यांतील माणसं आपल्याला जीवापाड जपतात असंच काहीसं या व्हिडिओत दिसून आलं. या व्हिडिओनं अनेकांचं मन जिंकून घेतलं आहे. (Boy receiving farewell from his house help goes viral see emotional video)

हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर अनीश भगतनं (Anish Bhagat) ३ दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सुरूवातीला हे लोक गाडीत बसतात आणि कामवाल्या मावशींच्या घरी जातात. या महिलेचं नाव रेशमा असं आहे.  घरी पोहोचल्यानंतर इतर सदस्य  त्याच्या डोक्यावर टिळा  लावलात  आणि पारंपारीक पद्धतीनं त्याचं स्वागत करून शाल, श्रीफळही देतात. 

रेशमाचं संपूर्ण कुटुंब  स्वागतासाठी उत्साही होतं. त्यानंतर अनीश भगत यांना कामवाल्या बाईकडून स्वादीष्ट जेवणही वाढण्यात आलं. शहर सोडून जात असलेल्या मुलांनी हा आमच्यासाठी खूपच भावनीक क्षण असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी माऊशींच्या कुटुंबासोबत काही फोटोज काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. या व्हिडिओला

कॅप्शन देण्यात आलं की, 'मी किती भावनिक झालोय हे मी व्यक्त करू शकत नाही.  रेश्मा दी माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला शिक्षणासाठी बाहेर जाण्याबद्दल खूप वाईट वाटतंय, कारण मला  रोज तिला पाहण्याची सवय आहे. तिचे हे हावभाव मी पाहू शकलो नाही. कारण तिने नेहमीच खऱ्या अर्थाने आमची काळजी घेतली आहे. तिने ज्या पद्धतीने आमचे तिच्या घरी स्वागत केले ते खूपच आनंददायी होते.

इतकेच नाही तर आम्हाला स्पेशल फिल करून देण्यासाठी तिने केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. मी तिला जास्त वेळा पाहू शकणार नाही याचे मला दुःख आहे. पण, हे आमच्यासाठी शेवटचे नाही. खरं तर ही एक नवीन सुरुवात आहे. रेश्मा दी सदैव माझ्यासोबत आणि तुमच्या सर्वांसोबत असेल.' 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया