Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला, कमालच झाली! साखरपुड्याच्या दिवशी बॉसचा आदेश, लग्न ही इर्मजन्सी नाही- मुकाट्याने कामावर ये..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:47 IST

एका महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर आपल्या कामाच्या ठिकाणचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

एका महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर आपल्या कामाच्या ठिकाणचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिच्या साखरपुड्याच्या काही दिवस आधीच बॉसने तिला सुनावलं की, "लग्न ही काही मेडिकल इमर्जन्सी नाही, त्यामुळे कामावर ये!" या आदेशामुळे कर्मचारी महिला केवळ हैराण झाली नाही, तर वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर प्रचंड तणावात आली आहे.

महिलेने आपल्या पोस्टमध्ये कामाच्या जाचक अटींचंही वर्णन केलं आहे. तिला दिवसभर झूम कॉल्सवर राहावं लागतं आणि प्रत्येक तासाचे अपडेट द्यावे लागतात. ऑफिसने चक्क 'जिओ-फेन्सिंग' सुरू केलं आहे, जेणेकरून कोणताही कर्मचारी ऑफिसच्या लोकेशूनपासून १२० किलोमीटरपेक्षा जास्त लांब जाऊन काम करू शकणार नाही.

दोन महिने आधीच केलेली रजेची मागणी 

या कर्मचाऱ्याने स्पष्ट केलं की, तिने आपल्या साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी दोन महिने आधीच ईमेलद्वारे रजेची मागणी केली होती. तिने मॅनेजरला सर्व माहिती दिली होती, तरीही कंपनीने तिच्या अनुपस्थितीत कामाचं कोणतंही नियोजन केलं नाही. आता साखरपुड्याची वेळ जवळ आल्यावर कंपनी तिला चक्क वीकेंडलाही काम करण्याची सक्ती करत आहे.

"सर्व कामं वेळेत पूर्ण केली"

महिला म्हणाली की, "मी माझी जबाबदारी कधीच झटकली नाही आणि सर्व कामं वेळेत पूर्ण केली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मॅनेजरला माझ्या कामाबद्दल फारशी माहितीही नसते आणि तो स्वतः अनेकदा संपर्काबाहेर असतो."

नेटिझन्सनी दिली साथ 

रेडिटवरील या पोस्टवर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलं की, "जेव्हा प्रत्येक गोष्ट 'हाय प्रायोरिटी' दाखवली जाते, तेव्हा कशाचंच महत्त्व उरत नाही." तर दुसऱ्या एका युजरने आपल्या चांगल्या मॅनेजरचा अनुभव सांगताना म्हटलं की, "माझ्या मॅनेजरने चुकून माझ्या साखरपुड्याच्या दिवशी मला कॉल केला होता, पण सत्य समजताच त्यांनी माझी माफी मागितली होती."

English
हिंदी सारांश
Web Title : Boss Orders Employee to Work Before Engagement, Sparks Outrage

Web Summary : A woman was ordered by her boss to work before her engagement, despite prior leave requests. The company's strict policies, including geo-fencing and constant monitoring, added to her stress. Netizens are expressing outrage and sharing supportive experiences online.
टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल