Join us

इंस्टाग्रामच्या सीईओंना भलतीच आवडली श्रद्धा कपूरने खाऊ घातलेली पुरणपोळी, पहिला घास घेताच म्हणाले.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 15:20 IST

Shraddha Kapoor Gave Maharashtra Special Puranpoli To Instagram CEO: इंस्टाग्रामचे सीईओ ॲडम मोसेरी (Instagram CEO Adam Mosseri) यांना अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या घरची पुरणपोळी खाऊ घातली.. त्यावर बघा त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती.. 

ठळक मुद्देपुरणपोळी खाताच मोसेरी यांची नेमकी काय प्रतिक्रिया असू शकते, हे ऐकण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणून घेण्यासाठी श्रद्धाप्रमाणेच सभागृहात उपस्थित कित्येक लोक उत्सूक होते.

पुरणपोळी हा महाराष्ट्राचा एक अतिशय महत्त्वाचा गोड पदार्थ. महाराष्ट्रातल्या घराघरांत वेगवेगळ्या सणवारानिमित्त पुरणपोळी हमखास केली जाते आणि विशेष म्हणजे काही अपवाद सोडले तर जवळपास सगळ्याच मराठी लोकांना ती अतिशय आवडते.. मऊ लुसलुशीत गरमागरम पुरणपोळी, तिच्यातून दरवळणारा जायफळ- वेलचीचा सुवास, त्या पोळीवर प्रेमाने लावलेले साजूक तूप.. असा सगळा थाट असेल तर मराठी माणूस खुश होऊन जातो. तसंच काहीसं श्रद्धा कपूरचंही आहे. ती शक्ती कपूरची मुलगी असली तरी आई पक्की महाराष्ट्रीयन. त्यामुळे मराठी संस्कृती, मराठी सण, मराठी परंपरा आणि मराठी जेवण असं सगळंच श्रद्धा कपूरचं आवडीचं. म्हणूनच तर तिच्या आवडीची पुरणपोळी तिने थेट इंस्टाग्रामचे सीईओ ॲडम मोसेरी यांनाच खाऊ घातली..(Shraddha Kapoor Gave Maharashtra Special Puranpoli To Instagram CEO Adam Mosseri)

 

'वेव्ज २०२५' या कार्यक्रमानिमित्त माेसेरी भारतात आले होते. २- ३ दिवस चाललेल्या या सोहळ्याला कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी श्रद्धा कपूरने माेसेरी यांच्याशी संवाद साधला.

काश्मिरी केशराच्या किंमतीत प्रचंड वाढ! १ किलोसाठी मोजावे लागत आहेत तब्बल ५ लाख

यावेळी व्यासपीठावरील चर्चेची सुरुवात होण्यापुर्वीच तिने तिचा घरून आणलेला डबा मागवला आणि त्यातून पुरणपोळी काढून एका ताटलीमध्ये वाढून ती मोसेरी यांना दिली. काटा- चमचा न वापरता ती कशी हातानेच खायची असते हे ही सांगितलं. ती सांगते त्याप्रमाणे मोसेरी यांनी पुरणपोळीचा रोल केला आणि तिचा पहिला घास तोंडात घेतला..

 

पुरणपोळी खाताच मोसेरी यांची नेमकी काय प्रतिक्रिया असू शकते, हे ऐकण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणून घेण्यासाठी श्रद्धाप्रमाणेच सभागृहात उपस्थित कित्येक लोक उत्सूक होते.

तेल- शाम्पू बदलून थकलात तरी केस गळणं थांबेना? करा 'हा' उपाय- महिनाभरात केस वाढतील

"it's really really good, it's comforting.." अशा शब्दांत मोसेरी यांनी पुरणपोळीचे कौतूक केले आणि श्रद्धाचा चेहरा अगदी उजळून आला. आपण आणलेला पदार्थ पाहुण्यांना आवडल्यावर जसा प्रत्येक स्त्री चा चेहरा चमकून जातो तसेच भाव श्रद्धाच्या चेहऱ्यावरही दिसून आले. शेवटी काय तर महाराष्ट्राच्या पुरणपोळीचा गोडवा सगळ्यांनाच आवडून जातो, हेच खरं..  

टॅग्स :सोशल व्हायरलश्रद्धा कपूरइन्स्टाग्राममराठीमहाराष्ट्र