Lokmat Sakhi >Social Viral > मी जाडजूड-अनहेल्दीच खुश आहे, असा दावा करणाऱ्या मुलीचा जेवताना ठसका लागून मृत्यू

मी जाडजूड-अनहेल्दीच खुश आहे, असा दावा करणाऱ्या मुलीचा जेवताना ठसका लागून मृत्यू

Body Positivity Influencer Dies While Eating : प्रसिद्ध बॉडी पॉझिटिव्हीटी इनफ्ल्यूएन्सरचा खाता-खाता ठसका लागून मृत्यू झाला. वजनामुळे श्वास कमी पडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 17:57 IST2025-01-08T17:54:54+5:302025-01-08T17:57:54+5:30

Body Positivity Influencer Dies While Eating : प्रसिद्ध बॉडी पॉझिटिव्हीटी इनफ्ल्यूएन्सरचा खाता-खाता ठसका लागून मृत्यू झाला. वजनामुळे श्वास कमी पडला.

Body Positivity Influencer Dies While Eating | मी जाडजूड-अनहेल्दीच खुश आहे, असा दावा करणाऱ्या मुलीचा जेवताना ठसका लागून मृत्यू

मी जाडजूड-अनहेल्दीच खुश आहे, असा दावा करणाऱ्या मुलीचा जेवताना ठसका लागून मृत्यू

अनेक नव्या प्रगतशील विचारांपैकी एक विचार म्हणजे बॉडी पॉझिटिव्हीटी . स्वतःच्या शरीराबद्दल वाईट न वाटून घेते आवडत्या गोष्टी करत राहा. कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही जसे आहात जाड, बारीक, उंच, बुटके तुम्ही छानच आहात.(Body Positivity Influencer Dies While Eating ) असा संदेश बॉडी पॉझिटिव्हीटी या संकल्पनेचा प्रचार करणारे लोक देतात. स्वत:च्या शरीराबद्दल समाधानी असणं नक्कीच चांगलं आहे. पण आजकालच्या जंकफुडच्या काळात बॉडी पॉझिटिव्हीटीच्या नावाखाली अस्वास्थ्यकर आयुष्य जगणारे आणि जगण्याचा संदेश देणारे लोकही आहेत.(Body Positivity Influencer Dies While Eating )

जे लोक याविषयी संदेश देतात त्यांना बॉडी पॉझिटिव्हीटी इनफ्ल्यूएन्सरस् असे म्हणतात. स्वत:च्या सोशल मिडिया हॅन्डलवर हे लोक स्वत:चे फोटो व्हिडिओ टाकून,आहात तसेच राहा. हवं तसं वागा. असं सांगून लोकांना प्रेरित करतात.(Body Positivity Influencer Dies While Eating ) पण बॉडी पॉझिटिव्हीटीचा नक्की अर्थ काय? स्वत:वर प्रेम करण्याच्या नावाखाली शरीराची वाट लावण्याचे काम देखील हे लोक करतात. स्थूलता स्वीकारणं शरीरासाठी सकारात्मक कसं असू शकतं? व्यायाम करू नका दिवस रात्र खात राहा.(Body Positivity Influencer Dies While Eating ) हे संदेश सकारात्मक असूच शकत नाहीत.

अशाच एका बॉडी पॉझिटिव्हीटी इनफ्ल्यूएन्सरचा मृत्यू झाला आहे. सतत खात राहा मला खायला आवड असं ती तिच्या पोस्टस् वर सांगत असायची. तिचे नाव कॅरोल अकोस्ता असे होते. न्यूयॉर्क मधील एका उपहारगृहात कुटुंबासमवेत जेवत असताना घास गिळण्यात अचानक तिला त्रास झाला. गिळताना ठसका लागून श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला..  तिचे वय २७ वर्षे होते.६.७ दशलक्ष लोक तिला फॉलो करतात.

 

कॅरोलचा असा अचानक झालेला मृत्यू दुर्देवी आहे. तिने अनेक लोकांना आत्मविश्वास मिळवून दिला होता.(Body Positivity Influencer Dies While Eating ) गेल्या काही वर्षात अनेक बॉडी पॉझिटिव्हीटी इनफ्ल्यूएन्सरसचा मृत्यू झाला आहे. त्यांनी दिलेले संदेश ऐकावेत का? असा प्रश्न उत्पन्न होतो. स्थूल लोकं बॉडी पॉझिटिव्हीटीच्या नावाखाली शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. हे नक्कीच पॉझिटिव्ह नाही. शरीराची काळजी सर्वांनीच घेणं गरजेचं आहे. स्थूल शरीराबद्दल समाधानी होणे पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह विचार आहे.      
     

Web Title: Body Positivity Influencer Dies While Eating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.