Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > लंडनच्या रस्त्यावर लागत आहेत रांगा - पिझ्झा बर्गरसाठी नव्हे तर आपल्या लाडक्या समोशासाठी , कारण....

लंडनच्या रस्त्यावर लागत आहेत रांगा - पिझ्झा बर्गरसाठी नव्हे तर आपल्या लाडक्या समोशासाठी , कारण....

Bihari Samosa Ghantawala - Queues are forming on the streets of London - not for pizza or burgers, but for our beloved samosas : लंडनमध्ये गाजतोय भारतीय चवीचा समोसा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 14:14 IST2025-10-27T14:12:55+5:302025-10-27T14:14:08+5:30

Bihari Samosa Ghantawala - Queues are forming on the streets of London - not for pizza or burgers, but for our beloved samosas : लंडनमध्ये गाजतोय भारतीय चवीचा समोसा.

Bihari Samosa Ghantawala - Queues are forming on the streets of London - not for pizza or burgers, but for our beloved samosas | लंडनच्या रस्त्यावर लागत आहेत रांगा - पिझ्झा बर्गरसाठी नव्हे तर आपल्या लाडक्या समोशासाठी , कारण....

लंडनच्या रस्त्यावर लागत आहेत रांगा - पिझ्झा बर्गरसाठी नव्हे तर आपल्या लाडक्या समोशासाठी , कारण....

भारतीय पदार्थांची लोकप्रियता आता फक्त देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. आपल्या मसालेदार, सुगंधी आणि स्वादिष्ट जेवणाने भारतीयांनी जगभरातील लोकांची मनं जिंकली आहेत. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे समोसा. चविष्ट आणि पोटभरीचा तसाच खिशाला परवडणारा हा पदार्थ भारतात सगळीकडेच लोकप्रिय आहे. (Bihari Samosa Ghantawala - Queues are forming on the streets of London - not for pizza or burgers, but for our beloved samosas)तळलेला, कुरकुरीत आणि मसालेदार बटाट्याच्या सारणाने भरलेला हा त्रिकोणी पदार्थ आता जगभर प्रसिद्ध होत आहे. या चवीचा झेंडा लंडनमध्ये फडकवणारा एक विक्रेता सध्या सोशल मिडियावर फार व्हायरल झाला आहे. कलिशप्रसाद किशनलाल शाह, याने 'बिहारी समोसा घंटावाला' या नावाने भारतीय चवीचं परदेशात सुंदर प्रतिनिधित्व केलं आहे.

गुजरातमधील नाडीया येथे १९७२ साली या ब्रँडची सुरुवात झाली. छोट्या उपक्रमाने सुरू झालेला हा प्रवास आता लंडनच्या रस्त्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतात जसा समोसा नाश्त्याचा अविभाज्य भाग आहे, तसा तो आता लंडनमधील लोकांचाही आवडता स्ट्रीट फूड आयटम झाला आहे. कलिशप्रसाद शाह पारंपरिक बिहारी मसाले, घरगुती पद्धत आणि कुरकुरीत आवरण जपत समोसे विकत आहेच, मात्र सध्या त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तो एक व्यक्ती म्हणूनही फार हसतमुख असल्याचे समजते. लंडनमध्ये तो आता एक प्रसिद्ध विक्रेता झाला आहे. तसेच सोशल मिडियावरही प्रसिद्ध झाला आहे. 

लंडनच्या South Harrow भागात त्यांचा पहिला स्टॉल सुरु झाला आणि लोकांनी अक्षरशः त्यासाठी रांगा लावायला सुरुवात केली. सोशल मीडियावर त्यांच्या समोश्यांचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झाले. लोकप्रियतेमुळे दुसरी शाखा Wembley येथे सुरू केली. 'Bihari Samosa Ghantawala' आता एक ब्रँड आहे. या दुकानात येणारे ग्राहक केवळ समोसा खात नाहीत, तर त्यांना भारताची आठवणही अनुभवायला मिळते. त्या मसाल्यांचा सुगंध, त्या गरमागरम समोश्यांचा पहिला घास आणि त्याच्यासोबत चहा, जणू भारताचं छोटं दर्शन घडवतं. ऑफिसच्या ब्रेकमध्ये, कॉलेजच्या कट्ट्यावर, किंवा पावसाळ्यात समोसा नेहमीच आवडीने खाल्ला जातो. आता हीच भावना लंडनच्या रस्त्यांवर पोहोचली आहे, कारण भारतीय चव जिथे जाते तिथे लोकांच्या मनात जागा करतेच.
 

Web Title : 'बिहारी समोसा' के कारण लंदन में समोसों के लिए लगी कतारें।

Web Summary : भारतीय समोसे अब लंदन में एक स्ट्रीट फूड सनसनी हैं। गुजरात में शुरू हुआ 'बिहारी समोसा घंटावाला' लंदन में लोकप्रिय हो गया है। पारंपरिक बिहारी मसालों और कुरकुरी परत के लिए जाने जाने वाले, विक्रेता का साउथ हैरो स्टॉल भारत का स्वाद प्रदान करता है।

Web Title : London queues for samosas, not burgers, thanks to 'Bihari Samosa'.

Web Summary : Indian samosas are now a London street food sensation. 'Bihari Samosa Ghantawala,' started in Gujarat, has become popular in London. Known for traditional Bihari spices and a crispy crust, the vendor's South Harrow stall attracts long queues, offering a taste of India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.