Bhopal Viral News: मासिक पाळीदरम्यान पाळल्या जाणाऱ्या प्रथांचा विरोध करत भोपाळमधील एका महिलेनं आपलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मासिक पाळीदरम्यान तिला अनेक भेदभावांचा सामना करावा लागला, जसे की, एका खोलीत बंद करून ठेवणं आणि आंघोळीला परवानगी न देणे इत्यादी. महिलेनं जेव्हा आपल्याकडे पतीकडे याबाबत तक्रार केली तर त्यानंही हात वर करत तिला मदत नाकारली. यानंतर महिलेनं ठरवलं की, ती या अंधश्रद्धेंवर विश्वास ठेवणार नाही आणि सासर सोडून देणार. महिलेचं हे पाउल जुन्या रिती-रिवाजांविरोधातील उभं राहण्याचं प्रतीक आहे.
कपलनं आता सहमतीनं घटस्फोट घेतला आहे. दोघांचंही वय ३० च्या आसपास आहे आणि दोघांचं लग्न घरातील लोकांनी जुळवलं होतं. दोन वर्षाआधीच त्यांचं लग्न झालं होतं. महिलेचा पती एका पुजारी आहे आणि भोपळच्या जवळ एका छोट्या गावात आई-वडिलांसोबत राहतो. लग्नानंतर महिलेला लवकरच समजलं की, तिचा परिवार पारंपारिक आणि जुन्या रिती-रिवाजांनुसार चालतो. महिला सासरच्या लोकांच्या अंधश्रद्धा आणि जुन्या विचारांना कंटाळली. महिलेच्या पतीनंही यात तिची मदत केली नाही म्हणून तिनं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
मासिक पाळीदरम्यान चुकीची वागणूक
महिला सासरमध्ये आल्यावर पहिल्याच मासिक पाळीदरम्यान हैराण झाली होती. कारण तिला सात दिवस किचन किंवा पूजा घरात जाऊ दिलं गेलं नाही. तिला घराबाहेर न जाण्यास आणि एकाच खोलीत राहण्यास सांगण्यात आलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या सासूनं तिला आठवडाभर आंघोळीची परवानगी दिली नाही. महिलेनं जेव्हा याबाबत पतीकडे तक्रार केली तर त्यानंही काही मदत केली नाही. पती म्हणाला की, तिला या नियमांचं पालन करावं लागेल आणि त्यानं यात काहीच मदत केली नाही.
महिलेनं सांगितलं सत्य
महिलेसाठी या घरात समस्या आणखी तेव्हा वाढली जेव्हा सासरच्या लोकांनी म्हटलं की, जेव्हा ती बाहेर जाते, तेव्हा रस्त्यावरील कुत्रे भुंकतात आणि तिचा पाठलाग करतात. हा तिच्यावर वाईट आत्मा असल्याचा प्रभाव आहे. ही गोष्ट सहन न झाल्यानं महिलेनं लग्नाच्या चार महिन्यांनंतरच सासर सोडलं आणि आपल्या आई-वडिलांच्या घरी परत गेली.
मोडलं लग्न
महिलेनं आपल्या पतीला सांगितलं की, तिच्यासाठी तिच्या पारंपारिक सासरवाल्यांसोबत राहण अवघड आहे. यानंतर दोघांनी सहमतीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानं दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आणि घटस्फोटाचा आदेश जारी केला.
काउन्सेलर काय म्हणाल्या?
या केसमध्ये काउन्सेलर राहिलेल्या सपना प्रजापति यांनी सांगितलं की, हे एक कटू सत्य आहे की, आजही काही लोक जुन्या आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्या म्हणाल्या की, 'महिलेनं सांगितलं की, तिला मासिक पाळीदरम्यान केवळ टॉयलेटला जाण्याची परवानगी होती. अशात तिला फार घाणेरडं वाटत होतं आणि तिच्या अंगाचा वासही येत होता'.