Join us

Bharatanatyam And Hip Hop : पोरींनी वेस्टर्न डांन्सला दिला भारतीय तडका; व्हायरल होतोय भरतनाट्यम हिप-हॉपचा अनोखा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:22 IST

Bharatanatyam And Hip Hop : : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही भारतीय मुली फ्यूजन डान्स करताना दिसत आहेत.

आपल्या देशात विविध जाती-धर्माच्या लोकांसह अनेक प्रकारच्या सामाजिक संस्कृती आढळतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवनशैली आणि दिनचर्या समाविष्ट आहेत. देशभरात राज्यानुसार नृत्य प्रकारांमध्ये विविधता पाहायला मिळते. ज्यामध्ये मुद्रा आणि सादरीकरणाची शैली आहे. ज्यामध्ये भरतनाट्यम हा सर्वात कठीण नृत्यप्रकार आहे. ज्यासाठी खूप सराव करावा लागतो. (Dancers perform Bharatanatyam and hip hop fusion in viral video)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही भारतीय मुली फ्यूजन डान्स करताना दिसत आहेत. ज्यामध्ये तीन मुली भरतनाट्यम आणि हिप-हॉपचे फ्युजन करताना दिसत आहेत. जे पाहून युजर्सचे डोळे उघडेच राहिले आहेत. या व्हिडिओनं  प्रत्येकाला विचार करायला भाग पाडले आहे.

हिप पॉपसह भरतनाट्यम

कोरिओग्राफर उषा यांनी  ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मिथुजा आणि जनुषासोबत अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, हे तिघे हिप-हॉप स्टाइल स्टेप्ससह भरतनाट्यम सादर करताना दिसत आहेत. ज्याला त्यांनी हायब्रिडभारतम असे नाव दिले आहे.

व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'HybridBharatam' हा हिप-हॉप आणि भरतनाट्यममध्ये स्विच करण्याचा माझा स्वतःचा मार्ग आहे. ही दोन नृत्ये आहेत जी मला आवडतात आणि त्यांचा आदर करण्यासोबतच मी रोज शिकतेदेखील आहे. प्रत्येक नृत्याचे सार टिकवून ठेवणे आणि मला न्याय देणारे काहीतरी तयार करणे हे माझे ध्येय आहे.

सध्या हिप-हॉप आणि भरतनाट्यमचा हा फ्युजन पाहणाऱ्यांचे डोळे उघडेच राहीले आहेत. प्रत्येकाला त्यांच्या कामगिरीचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाहीये. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ट्विटरवर 7 लाख 88 हजार आणि इंस्टाग्रामवर 11 लाख 73 हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य