Join us

स्मोकी पान खाऊन रिल करताय? आतड्याला पडतील छिद्र, पाहा चिमुकलीच्या पोटाचं काय झालं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2024 18:00 IST

Bengaluru kid, 12, eats ‘smoky paan’, undergoes surgery after hole in her stomach : फायर पान, स्मोकी पान अनेकजण हौशीने खातात, पण जीवावर बेतलं तर काय? वाचा हा प्रकार..

लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती. एखादी वेगळी गोष्ट दिसली की, आपण त्याकडे आकर्षित होतोच (Smokey Paan). सोशल मिडीयावर काही गोष्टी व्हायरल होतात, आणि आपण ती गोष्ट करण्यास प्रयत्न करतो (Social Viral). मध्यंतरी स्मोकी पान खाण्याचा ट्रेण्ड आला होता. कुल बनण्यासाठी लोक स्मोकी पान खाताना रील्स शूट करतात. पण हेच स्मोकी पान एका चिमुकलीच्या जीवाशी येता येता राहिलं. तिने स्मोकी पान खाल्लं, आणि पोटात आतड्यांना छिद्र पडले. आता तुम्ही म्हणाल पान खाऊन पोटात छिद्र तयार होणं कसं शक्य आहे? मुलांना पान खायला देणं कितपत योग्य? स्मोकी पान खाणं योग्य की अयोग्य?(Bengaluru kid, 12, eats ‘smoky paan’, undergoes surgery after hole in her stomach).

स्मोकी पान जीवाशी येता येता..

लहान मुलं नवीन काहीतरी पाहतात आणि त्या गोष्टीसाठी हट्ट धरतात. पण बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट, आरोग्यासाठी योग्य असेलच असे नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 'बेंगळूरूमधील एचएसआर लेआउट, येथे एका १२ वर्षांच्या मुलीने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये 'स्मोक पान' खाल्लं. या प्रकारच्या पानामध्ये लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातो. पण लिक्विड  नायट्रोजन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

ना डाळ- तांदूळ, ना इनो अगदी इडली पात्रही नको! करा १० मिनिटात इडली पात्राशिवाय इडली

पान खाल्ल्यानंतर मुलीच्या पोटात अचानक दुखू लागलं. काही वेळातच मुलगी वेदनेने तडफडू लागली. तिची तडफड पाहून, पालकांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिच्या पोटात आतड्यांना छिद्र तयार झाल्याचं सांगितलं.

दरम्यान नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलीची शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीसह एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी ही शस्त्रक्रिया मुलीवर करण्यात आली.

यासंदर्भात, ऑपरेशन सर्जन डॉ विजय एचएस म्हणाले, "इंट्रा- ऑप ओजीडोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात पोटाची तपासणी करण्यासाठी लवचिक ट्यूब वापरली जाते. या ट्यूबने अन्ननलिका तापासली जाते. दरम्यान, यातून मुलीच्या पोटात आतड्यांना छिद्र तयार झाल्याचं दिसून आलं. शस्त्रक्रियेनंतर ६ दिवसांनी चिमुकलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले.''

नायट्रोजन गॅस आरोग्यासाठी का घातक?

नारायण रुग्णालयानुसार, नायट्रोजन गॅसच्या बंद जागेतील जलद बाष्पीभवनामुळे दबाव निर्माण होत असतो. यामुळे त्वचेचे नुकसान होते. लिक्विड नायट्रोजनचा धूर शरिरात घेतल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो नायट्रोजन गॅसपासून लांब राहिलेले बरे.'

आईबाबा, आपले मूल वाया जाऊ नये अशी भीती वाटते? घरात वेळीच करा ५ गोष्टी..

मुलीने सांगितला सर्व प्रकार..

मीडियाशी संवाद साधताना मुलीने सांगितले की, ''ती एका लग्नाला गेली होती. तेथे काही लोक स्मोकी पान खात होते. हे पाहून मला ही स्मोकी पान खाण्याची इच्छा झाली. पान खाल्ल्यानंतर पोटात असह्य वेदना सुरु झाल्या. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. नंतर समजले की, नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात आतड्यांना छिद्र निर्माण झाले होते.''

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यसोशल व्हायरल