Beautiful Handwriting In The World: प्रत्येकाचं अक्षर हे वेगवेगळं असतं. काही लोकांचं अक्षर खूप सुंदर आणि स्वच्छ असतं, तर काही लोकांचं अक्षर वाकडं-तिकडं असतं. चांगलं अक्षर वाचणाऱ्या व्यक्तीवर चांगला प्रभाव टाकतं आणि वाचण्या-बघण्यातही मजा येते. सध्या एका तरूणीच्या सुंदर मोत्यासारख्या अक्षराची खूप चर्चा रंगली आहे. तिनं लिहिलेली एक नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
महत्वाची बाब म्हणजे जगातील सगळ्यात सुंदर अक्षर असणारी ही तरूणी ना अमेरिकेतील आहे, ना यूकेतील आहे, ना भारतातील. ही तरूणी नेपाळमधील असून प्रकृति मल्ला असं तिचं नाव आहे. प्रकृति मल्ला १६ वर्षांची असतानाच आपल्या मोत्यासारख्या अक्षरांसाठी फेमस झाली होती. जेव्हा ती १४ वर्षांची होती आणि ८ व्या वर्गात होती तेव्हा तिची एक असायमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
असायनमेंटमधील अक्षर इतकं सुंदर होतं की, जगाचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं. लोकांना तिच्या या अक्षरांनी चकीत केलं.
साल 2022 मध्येच नेपाळमध्ये संयुक्त अरब अमीरातच्या दुतावासानं ट्विट करून सांगितलं की, प्रकृति मल्लाला जगातील सगळ्यात चांगलं अक्षर असल्याचा पुरस्कार देण्यात आला.
जेव्हापासून कॉम्प्युटरचा जमाना आला लोकांनी हातानं लिहिणं बंद केलं. आधी अक्षरांवर खूप लक्ष दिलं जात होतं, आता कुणी हॅंडरायटिंगवर इतकं लक्ष देत नाहीत. काही लोकांचं अक्षर आजकाल सुंदर असतं.
प्रकृतिनं ५१व्या स्पिरिट ऑफ द यूनियनच्या निमित्तानं संयुक्त अरब अमीरातच्या नेतृत्वाला आणि नागरिकांना अभिनंदन पर पत्र लिहिलं. हे पत्र तिनं यूएई दुतावासाकडे सोपवलं होतं. प्रकृतिचा नेपाळच्या सशस्त्र दलाकडूनही सन्मानित करण्यात आलं.