घरातील बेसिनचे सिंक, बाथरुममधील फ्लोअर ड्रेन किंवा घरातील इतर नळ्या वेळोवेळी ब्लॉक होणे ही सामान्य समस्या आहे. केस, साबणाचा थर, तेलकट पदार्थ आणि धूळ यामुळे नळ्यांमध्ये हळूहळू घाण साचते. ( basin sink and bathroom drain, smelling bad? 3 home remedies, will remove the accumulated dirt quickly)पण काही सोपे घरगुती उपाय नियमित केले तर नळ्या स्वच्छ ठेवणे अगदी सोपे होते आणि मोठा खर्चही वाचतो. तसेच आठवड्यातून एकदा असे उपाय केले तर पाणी साठणे किंवा अन्न अडकणे असे त्रास नंतर उद्भवणारच नाहीत.
सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे गरम पाणी. आठवड्यातून एक-दोन वेळा उकळते गरम पाणी नळीत ओतल्यास आत साचलेला तेलकटपणा आणि साबणाचा थर सैल होतो आणि पाणी सहज वाहू लागते. विशेषतः किचन सिंकसाठी हा उपाय खूप उपयोगी ठरतो. मात्र प्लास्टिकचे पाईप असतील तर हा उपाय करु नका. कारण मग उलट पाईप फुटण्याची शक्यता जास्त असते.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हा आणखी एक लोकप्रिय उपाय आहे. अर्धा कप बेकिंग सोडा नळीत टाकून त्यावर एक कप व्हिनेगर ओता. काही मिनिटे फसफसू द्या आणि नंतर गरम पाणी ओता. या रिअॅक्शनमुळे नळीत साचलेली घाण, दुर्गंधी आणि ब्लॉकेज कमी होण्यास मदत होते. मीठ आणि गरम पाण्याचाही उपयोग करता येतो. थोडे जाड मीठ नळीत टाकून त्यावर गरम पाणी ओतल्यास नळीतले बॅक्टेरिया कमी होतात आणि दुर्गंधीही कमी होते. हा उपाय विशेषतः बाथरूम ड्रेनसाठी उपयुक्त आहे.
लिंबू आणि बेकिंग सोडा एकत्र वापरल्यास नळ्या स्वच्छ होण्यासोबतच त्यातील दुर्गंधी निघून जाते. बेकिंग सोड्यानंतर लिंबाचा रस टाकून काही वेळ ठेवावा आणि नंतर गरम पाणी टाकावे. हा उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. याशिवाय, आठवड्यातून एकदा ड्रेनची जाळी काढून स्वच्छ धुणेही महत्त्वाचे आहे. त्यात अडकलेले केस, कचरा काढून टाकल्यास नळी ब्लॉक होण्याची शक्यता कमी होते. शक्य असल्यास जुन्या टूथब्रशने जाळी स्वच्छ करावी.
किचन सिंकमध्ये तेलकट पदार्थ, उरलेले अन्न किंवा चहा पावडर थेट टाकणे टाळले तर नळ्या जास्त काळ स्वच्छ राहतात. तसेच बाथरूममध्ये केस साचू नयेत म्हणून ड्रेन कव्हर वापरणेही फायदेशीर ठरते. हे सर्व उपाय नियमित केले तर नळ्या स्वच्छ राहतात, दुर्गंधी येत नाही आणि पाणी अडत नाही. छोट्या सवयी अंगीकारल्यास मोठ्या समस्यांना सहज टाळता येते, आणि घरही नेहमी स्वच्छ व नीटनेटके राहते. जर या नळ्या जास्त खराब झाल्यातर त्यात त्यातून रोगराई पसरु शकते. त्यामुळे काळजी घ्या.
Web Summary : Blocked drains? Hot water, baking soda/vinegar, and lemon are effective home remedies. Regular cleaning prevents clogs and odors. Avoid pouring oil/food scraps down the drain for long-term cleanliness.
Web Summary : रुकी हुई नालियां? गर्म पानी, बेकिंग सोडा/सिरका और नींबू प्रभावी घरेलू उपाय हैं। नियमित सफाई से रुकावट और दुर्गंध से बचा जा सकता है। लंबे समय तक सफाई के लिए तेल/भोजन के टुकड़े नाली में डालने से बचें।