पावसाळ्यात पावसाची मज्जा तर येते, मात्र पावसाचे प्रमाण वाढायला लागले की जरा भीती वाटायला लागते. बाहेर छान गारेगार वातावरण झाले असते आणि अशातच अचानक जोरात ढग कडाडतात. (. Avoid these '3' things during a lightning storm)ढगांचा आवाज ऐकून जरा दचकायला होते तोच विजांचा कडकडाट ऐकू येतो आणि चमकणारी वीज आकाशात दिसते. मग आपण पटकन घरात शिरतो आणि गप्प बसून राहतो. सगळ्यांनाच विजेची भीती वाटते असे नाही. लहान मुलांना नक्कीच वाटते. विजेचा आवाज ऐकून दचकायला होते. वीज कधी कुठे पडेल याचा काही नेम नाही म्हणून घराबाहेर न पडणे योग्य असे ठरवून विजेला घाबरणारे गप्प घरात बसतात. मात्र विजेचा धोका घरात काय आणि बाहेर काय सगळीकडेच असतो. त्यासाठी जरा काळजी घ्यायला हवी. पावसाळा सुरु झाला आणि जास्त जोरात पाऊस पडायला लागला की वीज कडाडते. अशावेळी काही गोष्टींची काळजी घ्या.
१. वीज कडाडत असताना कधीही अंघोळीला जाऊ नका. खास म्हणजे शॉवर वापरु नका. हे ऐकायला अंधश्रद्धा असल्यासारखे वाटत असेल मात्र त्यामागे काही कारणे आहेत. घराच्या आजूबाजूला वीज पडू शकते. (. Avoid these '3' things during a lightning storm)असे झाल्यावर पाण्यातून वीज प्रवाह होऊ शकतो. पाईपलाइनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाण्याच्या संपर्कात येऊ नये. पाइप मेटलचे असतात. त्यावर लोखंड असते आणि वीज धातुंकडे आकर्षित होते. त्यामुळे प्लास्टिकचे पाइप पावसाळ्यात जास्त सोयीस्कर असतात. वीज चमकत असताना शॉवरचा वापर करु नका. अंघोळही करु नका.
२. पावसाळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्री. छत्री शिवाय साधे घराबाहेर पडताही येत नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का चुकीची छत्री वापरली तर तुम्ही वीज आकर्षित करुन घेऊ शकता. धातूचे दांडे असलेल्या छत्रीकडे वीज ओढली जाते. धातू हे उत्तम वीजवाहक असतात. त्यामुळे छत्रीचा दांडा अॅल्युमिनियम किंवा स्टीलचा नासलेलाच बरा.
३. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाहेर गडगडायला लागल्यावर सर्वप्रथम घरातील एसी फ्रिज ओव्हन अशा विजेसाठी जड असणाऱ्या वस्तू बंद कराव्यात. इलेक्ट्रिक फ्लक्चूएशनमुळे ते फुटू शकतात. त्यामुळे जास्त पाऊस पडत असताना उपकरणे बंदच ठेवावी. मोबाइल सुद्धा कमीच वापरावा.