योग्य आहार, व्यायाम यासोबतच पुरेशी झोप घेणं हे देखील उत्तम शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी झोप मिळणे गरजेचे असते. जेव्हा आपल्याला पुरेशी विश्रांती किंवा झोप मिळत नाही, तेव्हा आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलाच असेल. रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, किंवा झोपेचे नियमित वेळापत्रक नसल्याने याचा परिणाम आपल्या खाण्यापिण्याच्या वेळांवरही होत असतो. पुरेशी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी एक चांगला उत्साह निर्माण होऊन काम करण्यासाठी चांगली ऊर्जा निर्माण होते. रात्रीच्या झोपेने आरोग्याच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात.
नक्की कोणत्या आहेत त्या ५ चुका ?
१. रात्रीच्या जेवणात खूप जड आहार घेणे :- रात्रीच्या जेवणात खूप जड आहार घेतल्याने आपल्याला झोप येण्यात खूपच त्रास होतो. झोपण्याच्या किमान ३ तास आधी रात्रीचे जेवण घ्यावे. आपण रात्रीच्या जेवणात कधी कधी खूपच रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या खातो. या रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या पचनास खूप वेळ लागतो. अशा भाज्यांचे सहज पचन होत नाही. त्यामुळे आपले शरीर या रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या पचवायला जास्त वेळ घेते. जेवल्यानंतर पुढील कित्येक तास आपल्या शरीरात ही पचनाची क्रिया चालू असते. पचनाची ही क्रिया शरीरात चालू असल्या कारणाने आपल्या झोपेच्या क्रियेत शरीर बदल करते. रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्हीसोबतच आपले शरीर कडधान्य पचविण्यासदेखील जास्त वेळ घेते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात रस्सेदार किंवा मसाला ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या आणि कडधान्य खाणे शक्यतो टाळा. रात्रीच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांपासून तयार झालेल्या भाज्या खाणे सर्वात उत्तम पर्याय आहे. झोपण्यापूर्वी जड आहार घेतल्यास अपचन, छातीत जळजळ किंवा पचनाबाबत इतर समस्या उद्भवतात. शक्यतो रात्री हलका आहारच घ्यावा. रात्री जड आहार घेण्यासोबतच जर आपण खूप उशिरा जेवत असाल तर ते देखील आपल्याला झोप न येण्याचे मुख्य कारण असू शकते.
२. झोपण्याआधी चहा - कॉफी पिणे टाळा :- आपल्यापैकी काही लोकांना झोपण्याआधी चहा - कॉफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक ठरु शकते. चहा - कॉफी ही उत्तेजक पेय आहेत. कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण भरपूर असते. झोपण्याआधी कॅफिनयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने आपली झोप बिघडू शकते. कॅफिनयुक्त पदार्थ म्हणजे केवळ कॉफी नाही तर चहा आणि चॉकलेटचा सुद्धा यात समावेश होतो. चहा, कॉफी घेतल्यानंतर आपल्याला चांगली झोप लागते असं वाटत असलं तरीही झोपण्याआधी चहा - कॉफी पिणे कधीही चांगले नाही.
३. गोड पदार्थ खाणे टाळा :- झोपण्याआधी मिठाई, केक, चॉकलेट यांसारखे गोड पदार्थ खाणे टाळा. झोपायच्या आधी भरपूर प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. झोपायच्या आधी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढते. याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. परिणामी आपल्या झोपेच्या चक्रात बिघाड होऊन आपल्याला वेळेवर झोप येत नाही. रात्रीच्या जेवणात डाळ-भात आणि चपातीचा समावेश आवर्जून करावा. हे अन्न आरोग्यासाठी चांगले आणि लाईट फुड देखील असते. परंतु रात्रीच्या जेवणाच्या वेळी आहारात साखरेचे प्रमाण टाळा. दुपारच्या जेवणात साखर खाणे फायदेशीर असते परंतु रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला नैसर्गिकरित्या येणाऱ्या झोपेत अनेक समस्या उद्भवतात.
५. झोपायच्या आधी स्क्रिन पाहू नका :- झोपायच्या १ तास आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रिन पाहणे टाळा. आपल्या शरीरातील मेलाटोनिन नावाचा हार्मोन्स हा आपल्या झोपेचे नियमन करतो. आपल्याला व्यवस्थित झोप येण्यासाठी हा हार्मोन्स फारच महत्वाचा असतो. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रिनमधून एक प्रकारच्या निळ्या रंगांचे प्रकाश उत्सर्जित करत असतात. या निळ्या रंगांचे रेज आपल्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्सचे उत्पादन करण्याचे थांबवतात. परिणामी झोप लागणे कठीण होऊन झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते.