मोबाइल फोन तर सगळेच वापरतात. आत्ताच्या काळात मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा आणि मोबाइल फोन असं म्हणावं लागेल. (Avoid 3 mistakes while using your mobile phone )कारण त्याच्याशिवाय आपण आता राहूच शकत नाही. त्याचे फायदे तोटे हा मुद्दा येतच नाही. त्याची गरज प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आहे. एकमेकांशी संवाद साधणं मोबाइलमुळे शक्य झाले आहे. आत्ताही तुम्ही मोबाइलवरतीच ही माहिती वाचत असाल. एकंदरीत काय तर मोबाइल प्रचंड महत्त्वाचा झालेला आहे. तो आपण आपल्या बरोबर सगळीकडे घेऊन जातो. चार्जिंग संपले की जीव वर-खाली होतो. मोबाइलचा वापर बंद करणे आता शक्य नाही. शेवटी ते यंत्रच. (Avoid 3 mistakes while using your mobile phone )त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आलेच. मोबाइल हाताळताना या ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा.
१. पॅन्टच्या किंवा शर्टच्या खिशात मोबाइल ठेवण्याची आपल्याला सवय असते.(Avoid 3 mistakes while using your mobile phone ) मोबाइलमधून ईएमएफ रेडीएशन तयार होतात. त्या शरीरासाठी चांगल्या नाहीत. या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडीएशन्स स्वास्थ्यासाठी हानिकारक असतात. असे अनेक रिसर्चमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे मोबाइल शरीराला टेकून राहणार नाही याची काळजी घ्या. बॅगेच्या कप्यामध्ये फोन ठेवा. शरीरापासून लांबही राहील आणि सुरक्षितही राहील.
२. आपल्याला तासंतास फोनवर बोलायची सवय असते. मोबाइल तेवढा वेळ आपल्या कानाला चिकटून असतो. काहींचे तर कामच फोनवरून चालते. अशांना फोनवर कमी बोला सांगू शकत नाही.जास्त वेळ फोनवर बोलल्यावर कान गरम व्हायला लागतो. त्याचे कारण या रेडियेशनच आहेत. मस्त उपाय म्हणजे फोनवर बोलताना इअरफोन्सचा वापर करा. फोन कानापासून लांब राहील.
३. उशीच्याखाली मोबाइल ठेवण्याची सवय बऱ्याच जणांना असते.पण ती सवय चांगली नाही. रात्री शरीर दिवसभराचा थकवा दूर करत असते. मोबाइलच्या रेडियेशन तसं होऊ देत नाहीत. त्यामुळे झोपताना मोबाइल लांब ठेवा मगच झोपा.