Join us

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं पहिल्यांदाच साडी नेसून काढला सेल्फी; मराठमोळा फोटो पाहून लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 12:25 IST

Australian cricketer amanda wellington shares mirror selfie : 19 डिसेंबरला अमांडाने स्वतःचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती गुलाबी साडी नेसलेली दिसत आहे.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. सध्या त्या पाच सामन्यांची T20I मालिका खेळत आहेत.  एक सामना बाकी असताना ऑस्ट्रेलियाने मालिका 3-1 ने जिंकली. महिला क्रिकेटपटू भारतात चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीपासून वेशभूषेचेही फोटोही शेअर केले आहेत.  (Australian cricketer amanda wellington shares mirror selfie in a saree internet loves it)

भारत दौऱ्यावर असलेली राष्ट्रीय क्रिकेट संघातील ऑस्ट्रेलियाची लेग-स्पिनर अमांडा वेलिंग्टन या दौऱ्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. भारतीय जेवणाचा आनंद आस्वाद घेण्यापासून ते मेहंदी लावण्यापर्यंत ही क्रिकेटपटू सर्वच गोष्टी पारंपरीक पद्धतीने करत आहे. 

19 डिसेंबरला अमांडाने स्वतःचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती गुलाबी साडी नेसलेली दिसत आहे. 18 डिसेंबर रोजी एका ट्विटमध्ये, क्रिकेटरने सांगितले होते की, तिने एक साडी विकत घेतली आहे आणि ती कशी घालायची याचा शोध घेत आहे. तिने शेअर केलेल्या पुढील ट्विटर पोस्टमध्ये तिनं साडी नेसून मिरर सेल्फी काढला होता. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

कमालच केली! पठ्ठ्यानं फक्त १० सेकंदात परफेक्ट साडी नेसली; बाईलाही लाजवेल असा व्हिडिओ

नेटिझन्सनी तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले.छान प्रयत्न.. छान दिसतेस. फक्त एक गोष्ट आहे की ती डाव्या बाजूला परिधान केली पाहिजे,” एका वापरकर्त्याने लिहिले.  सोशल मीडिया युजर्सनी साडी नेसण्याबाबत सुधारणा सांगितल्या आहेत. १ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.''

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियासाडी नेसणे