Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात प्राण्यांसोबत खेळताना घ्या ‘अशी’ काळजी, पाहा कोणते आजार होण्याची शक्यता- मुलांना धोका जास्त

पावसाळ्यात प्राण्यांसोबत खेळताना घ्या ‘अशी’ काळजी, पाहा कोणते आजार होण्याची शक्यता- मुलांना धोका जास्त

animal love, Take these precautions while playing with animals during the monsoon, see what diseases are likely to occur - Children are at higher risk : पावसाळ्यात प्राण्यांपासून जरा सावध राहा. रोगराई पसरण्याचा धोका जास्त असतो. पाहा कोणते प्राणी आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 09:00 IST2025-06-26T08:55:10+5:302025-06-26T09:00:02+5:30

animal love, Take these precautions while playing with animals during the monsoon, see what diseases are likely to occur - Children are at higher risk : पावसाळ्यात प्राण्यांपासून जरा सावध राहा. रोगराई पसरण्याचा धोका जास्त असतो. पाहा कोणते प्राणी आहेत.

animal love, Take these precautions while playing with animals during the monsoon, see what diseases are likely to occur - Children are at higher risk | पावसाळ्यात प्राण्यांसोबत खेळताना घ्या ‘अशी’ काळजी, पाहा कोणते आजार होण्याची शक्यता- मुलांना धोका जास्त

पावसाळ्यात प्राण्यांसोबत खेळताना घ्या ‘अशी’ काळजी, पाहा कोणते आजार होण्याची शक्यता- मुलांना धोका जास्त

पावसाळा फार सुंदर असतो. सगळीकडे सुंदर वातावरण असते. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. फुलांचा वास दरवळत असतो. वारा सुटलेला असतो. मात्र याच कालावधीत साथीचे रोग झपाट्याने पसरतात. (animal love, Take these precautions while playing with animals during the monsoon, see what diseases are likely to occur - Children are at higher risk)ऋतूची मज्जा घेताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात सगळीकडेच रोगराई पसरत असते. काही प्राण्यांमुळे रोगराई पटकन पसरते. त्यांच्या अंगावरील किटाणू  , पिसे, गोचीड आदीमुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो. प्राणी फार प्रेमळ आणि निरागस असले तरी थोडी आरोग्याची काळजी घेणे नक्कीच गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्राण्याजवळ जाण्याआधी काळजी घ्यावी. काही प्राण्यामुळे विविध व्हायरस पसरतात. कोरोनाचा अनुभव तर आपल्याला आहेच.

१. दिसायला अगदी लहान असणारे डास फारच धोकादायक ठरु शकतात. पावसाळा म्हणजे त्यांचाच ऋतू. भरमसाठ वेगाने संख्या वाढते. पावसाळ्यात पांढरे डाग असलेले डास जास्त दिसतात. संध्याकाळच्या वेळीतर कचाकच चावतात. डासांमुळे मलेरिया होतो. डेंग्यू होतो. तसेच चिकनगुनिया होतो. झिका सारखे आजार पसरतात. त्यामुळे डासांपासून सावध राहा. संध्याकाळी घरी धुरी करायची. तसेच दारे , खिडक्या बंद करुन घ्यायची.

२. घरी कोणत्यातरी कोपऱ्यात बीळ करुन त्यात उंदीरमामा राहतात. उंदीर घरभर फिरतो. उंदरामुळे आजार पसरतात. रॅट फिवर सारखा आजार पावसाळ्यात जास्त पसरतो. लॅपटोस्पिरा नावाचा एक आजार उंदरामुळे पसरतो. त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट वाढू द्यायचा नाही. 

३. मांजर हा प्राणी फार गोंडस असतो. घरी मांजर पाळली जाते. पावसाळ्यात मात्र कुठेही घाणीत बसून ती मांजर घरभर फिरते. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे असते. मांजराचे केस नाकातोंडात गेल्यामुळे दम्याच्या त्रास सुरु होतो. मांजरापासून फार असा काही धोका नसला तरी घरी लहान मुले असतील तर काळजी घेणे गरजेचे असते. 

४. पावसाळ्यात कुत्रे पिसाळतात. कुत्र्याला वफादार म्हटले जाते. मात्र पिसाळलेल्या कुत्रा जर कोणाला चावला तर त्या माणसाचा किंवा प्राण्याचा जीव वाचणे जवळपास अशक्यच होऊन बसते. रेबिज या रोगावर ठोस असे औषध अजून  आलेले नाही. त्यामुळे कुत्र्यांशी खेळताना जरा सावध राहा. पावसाळ्यात पाण्यामुळे कुत्रे पिसाळण्याचे प्रमाण जास्त असते. असा जखमी पिसाळलेला कुत्रा जर आजूबाजूला दिसला तर वेळीच त्याची नोंद करा. 

Web Title: animal love, Take these precautions while playing with animals during the monsoon, see what diseases are likely to occur - Children are at higher risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.