lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > सिंह समोर असताना मुलीने काय केलं पाहा, रागाने जंगलच्या राजाची अवस्था अशी झाली की..

सिंह समोर असताना मुलीने काय केलं पाहा, रागाने जंगलच्या राजाची अवस्था अशी झाली की..

Angry Lion Viral Video with Girls : वैतागलेला आणि काहीसा त्रासलेला सिंह आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 12:00 PM2022-09-05T12:00:37+5:302022-09-05T12:21:55+5:30

Angry Lion Viral Video with Girls : वैतागलेला आणि काहीसा त्रासलेला सिंह आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Angry Lion Viral Video with Girls : Anything for a photo! The girl did such a thing in front of the lion that she became the king of the jungle out of anger... | सिंह समोर असताना मुलीने काय केलं पाहा, रागाने जंगलच्या राजाची अवस्था अशी झाली की..

सिंह समोर असताना मुलीने काय केलं पाहा, रागाने जंगलच्या राजाची अवस्था अशी झाली की..

Highlights २६ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केला आहे.आपण एखाद्या लहान मुलाला किंवा आपल्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे चिडवतो त्याचप्रमाणे ही मुलगी सिंहाला चिडवते

जंगलचा राजा सिंह काय असतो हे आपल्याला माहित आहे, त्यामुळे त्याचं नाव ऐकूनही आपल्याला भिती वाटू शकते. पण काही जण विशेषत: तरुणी फोटोसाठी इतक्या वेड्या असतात की त्या काहीही करु शकतात. एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहायला गेलेल्या तरुणींनी त्याला विनाकारण चिडवले. इतकेच नाही तर तो चिडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरुणी सिंहाला त्रास देताना दिसत आहेत. त्यामुळे वैतागलेला आणि काहीसा त्रासलेला सिंह आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे (Angry Lion Viral Video with Girls). 

(Image : Google)
(Image : Google)

इन्स्टाग्रामवर ambafacts या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून अशाप्रकारे सिंहाला चिडवणे योग्य नाही अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. जीन्स आणि काळा टी शर्ट घातलेली एक मुलगी काचेच्या एका बॉक्समध्ये सिंहाला पाहण्यासाठी येते. त्यानंतर तिला पाहून सिंह आपल्या पुढच्या पायांचे पंजे काचेवर घासायला लागतो. ते पाहून ही मुलगीही आपल्या हाताने सिंहासारखेच करते. आपण एखाद्या लहान मुलाला किंवा आपल्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे चिडवतो त्याचप्रमाणे ही मुलगी सिंहाला चिडवत असल्याने ते पाहून आपल्याला काहीसे आश्चर्य वाटते. 


सिंहाला इतक्या जवळून पाहिल्यावर आपल्याला काहीशी भिती वाटू शकते. पण ही मुलगी मात्र अतिशय बिनधास्तपणे या सिंहाशी हातवारे करत खेळत असल्याचे दिसते. इतकेच नाही तर त्याच्याशी असा खेळ केल्यानंतर ती अतिशय मनसोक्तपणे हसताना दिसते. तर २ मिनीटांनी तिची एक मैत्रीण मागून आतमध्ये येते आणि त्या दोघी सिंहाच्या बाजूला फोटोसाठी पोज देतात. तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती या गुहेसारख्या ठिकाणातून त्यांचा फोटो काढत असल्याचे दिसते. २६ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केला आहे. तर अनेकांनी त्यावर एकाहून एक प्रतिक्रिया देत राग तर काहींनी आनंद व्यक्त केला आहे. 

Web Title: Angry Lion Viral Video with Girls : Anything for a photo! The girl did such a thing in front of the lion that she became the king of the jungle out of anger...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.