lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ 

अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ 

Viral Video of US Dancer: भारतीय पदार्थांपासून (Indian food) ते भारतीय पोशाखांपर्यंत (Indian dressing) अनेक गोष्टी आता विदेशी लोकांना मनापासून आवडत आहेत.. या अमेरिकन नृत्यांगणेचंही (American dancer) काहीसं तसंच आहे.. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 06:46 PM2022-07-30T18:46:55+5:302022-07-30T18:47:20+5:30

Viral Video of US Dancer: भारतीय पदार्थांपासून (Indian food) ते भारतीय पोशाखांपर्यंत (Indian dressing) अनेक गोष्टी आता विदेशी लोकांना मनापासून आवडत आहेत.. या अमेरिकन नृत्यांगणेचंही (American dancer) काहीसं तसंच आहे.. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ.

American dancer is in love with Punjabi style Bhangra dance, Her graceful dance is viral on social media  | अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ 

अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ 

Highlightsअगदी बारकाईने तिने भारतीय भांगडा डान्सर्सचे सगळे बारकावे टिपले असून ते आपल्या नृत्यातून ती जसेच्या तसे सादर करण्याचा प्रयत्न करते.

नृत्य- गायन या भारतीय कला, भारतीय स्वयंपाक घरात तयार होणारे वेगवेगळे चवदार पदार्थ.. भारतीय लोकांची सण- उत्सव साजरे करण्याची परंपरा, भारतीय पोशाख, योगसाधना या सगळ्याच गोष्टी हळूहळू परदेशी नागरिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत. कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येणारी खासियत, त्यातली नजाकत आणि त्यांचे वेगळेपण आता जगाच्या नजरेत ठसठशीत उठून दिसत आहे. म्हणूनच तर कधी एखादी रशियन तरुणी आलू के पराठे करण्याचा घाट घालते तर कधी अशी एखादी अमेरिकन महिला भारतीय संगीताच्या (American dancer's Bhangra love) प्रेमात पडते. 

 

सध्या सोशल मिडियावर या अमेरिकन महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (viral video) होत आहे. ओमाला Omala असं तिचं नाव. ती एक डान्सर आहे. olly_.g हे तिचं इन्स्टाग्राम (instagram share) पेज पाहिलं तर क्षणभर ती भारतीय की अमेरिकन असं कन्फ्युजन झाल्याशिवाय राहात नाही. कारण तिच्या जवळपास सगळ्याच पोस्टमध्ये ती कपाळावर टिकली, पंजाबी ड्रेस, ओढणी अशा भारतीय थाटात दिसते. तिने तिच्या डान्सचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि विशेष म्हणजे या सगळ्या रिल्समध्ये ती भारतीय गाण्यांवर आणि विशेषत: पंजाबी गाण्यांवर भांगडा करताना दिसते आहे. 

 

प्रत्येक गाण्यावर तिने केलेला भांगडा खरोखरंच अतिशय खास असून अत्यंत ग्रेसफुली ती नाचते आहे. भांगडा करताना जो काही उत्साह किंवा एक प्रकारचा चार्म लागतो, तो तिच्यात अगदी ठसठसून भरलेला आहे, असंच वाटतं. अगदी बारकाईने तिने भारतीय भांगडा डान्सर्सचे सगळे बारकावे टिपले असून ते आपल्या नृत्यातून ती जसेच्या तसे सादर करण्याचा प्रयत्न करते. तिची तब्येतही काही अगदी स्लिमट्रिम नाही.. बऱ्यापैकी जाड असं तिचं वर्णन करता येईल. पण तरीही ती ज्या पद्धतीने डान्स करतेय, जी एनर्जी दाखवतेय, ती खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच तर तिचे अनेक डान्स व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. 

 

Web Title: American dancer is in love with Punjabi style Bhangra dance, Her graceful dance is viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.