बहुसंख्य घरामध्ये टोमॅटो अगदी रोजच्या रोज स्वयंपाकात वापरले जातात. कधी भाजीमध्ये, आमटीमध्ये तर कधी चटणीमध्ये टोमॅटो घातले जातात. टोमॅटो दिसायला छान लालबुंद दिसले की आपण ते अगदी डोळेझाकून खरेदी करताे. पण टोमॅटोच्या रंगावर जाऊ नका. ते खरेदी करताना काही गोष्टी आठवणीने तपासून पाहा. कारण सनी लियॉनच्या घरात ज्याप्रमाणे टोमॅटोमध्ये अळ्या निघाल्या तशाच अळ्या तुमच्या घरातही टोमॅटो चिरताना त्यातून निघू शकतात (3 tips for buying fresh tomatoes). सध्या सनी लिओनीने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून टोमॅटोमधल्या अळ्या पाहून ती हैराण झाली आहे.(actress Sunny Leone found worms crawling in tomato)
टोमॅटो खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
१. टोमॅटो खरेदी करताना ते हातात घेऊन सगळ्या बाजुंनी व्यवस्थित तपासून घ्या. टोमॅटो खूप लालबुंद आणि खूप जास्त पिकल्यासारखे वाटत असतील तर ते घेऊ नका. अशा जास्त पिकलेल्या टोमॅटोमध्ये जास्त अळ्या असू शकतात.
२. टाेमॅटो हातात घेतल्यानंतर ते अलगदपणे दाबून पाहा. जर टोमॅटो सगळीकडून कडक लागत असेल आणि त्याची एखादी बाजुच थोडी दबलेली किंवा मऊ लागत असेल तर ते टोमॅटो घेणं टाळा.
३. टोमॅटोचं देठ तपासून पाहा. जर देठाकडचा भाग मऊ पडला असेल किंवा त्यातून हलकंसं पाणी बाहेर येत असेल तर तो टोमॅटो निश्चितच खराब आहे.
टाेमॅटो चिरतानाही काळजी घ्या
टोमॅटो विकत घेताना जशी काळजी घ्यायला हवी, तशीच काळजी तो चिरतानाही घ्यायला हवी. टोमॅटो चिरायला घेतल्यानंतर सगळ्यात आधी त्याचं देठ काढून मधोमध दोन भाग केले जातात.
आता जो कापलेला भाग आहे तो चाॅपिंग बोर्डवर खाली ठेवला जातो. त्यामुळे मग टोमॅटोच्या आतमध्ये नेमकं काय काय आहे, हे कळत नाही आणि पुर्ण टोमॅटो चिरला जातो. त्यामुळे टोमॅटो अर्धा कापल्यानंतर त्याच्या आतले डोळ्यांना व्यवस्थित दिसेल अशाच पद्धतीने तो ठेवा आणि कापा.