Join us  

रणबीर- आलियाच्या मेहेंदी कार्यक्रमासाठी करिनाने निवडला साडेपाच लाखांचा लेहेंगा! काय त्यात एवढे खास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 2:18 PM

Dressing of Kareena Kapoor: बेगम करिना कपूर खान यांचा त्यांचा भाऊ रणबीर कपूर (Ranbir- Alia wedding) यांच्या लग्नातला थाट खरोखरंच बघण्यासारखा होता.. रणबीर- आलियाच्या मेहेंदी कार्यक्रमासाठी करिनाने घातलेल्या लेहेंग्याची (costly lehenga of Kareena Kapoor) किंमत सर्वसामान्यांना थक्क करणारी आहे...

ठळक मुद्देकरिनाने बेबी ब्लू रंगाचा लेहेंगा घातला होता. स्ट्रेपी ब्लाऊज आणि घेरदार लेहेंग्यामध्ये करिना खरोखरंच अतिशय सुंदर दिसत हाेती.

कपूर आणि भट (Alia Bhat) ही दोन्ही चित्रपटसृष्टीतली बडी घराणी रणबीर- आलिया यांच्या निमित्ताने एकत्र आली. त्यामुळे या लग्नाची चर्चा आणि विवाहाबाबत सर्वसामान्यांच्या मनात असणारी उत्सूकता खरोखरंच शिगेला पोहोचली होती. बरं रणबीर- आलिया दोघेही खास आहेतच, पण या लग्नाला येणारी सगळी वऱ्हाडी मंडळीही तेवढीच तोलामोलाची.. त्यामुळे नवरा- नवरीची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचीही होतीच..

 

स्टार अभिनेत्री करिना कपूर म्हणजे रणबीरची चुलत बहिण. त्यामुळे भावाच्या लग्नात या थोरल्या बहिणीचा थाट खरोखरंच बघण्यासारखा होता. लग्नाच्या आदल्या दिवशी जो मेहेंदीचा कार्यक्रम झाला, त्यावेळी करिनाने बेबी ब्लू रंगाचा लेहेंगा घातला होता. स्ट्रेपी ब्लाऊज आणि घेरदार लेहेंग्यामध्ये करिना खरोखरंच अतिशय सुंदर दिसत हाेती. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी हा लेहेंगा डिझाईन केला होता. या लेहेंग्याची किंमत तब्बल 5,75,000 रुपये होती, असं सांगण्यात येतं. या लेहेंग्यावर करिनाने हिऱ्यांचे कानातले आणि गळ्यातलं घातलं हाेतं. सिक्विन, मोती, कुंदन आणि डायमंड्स यांचं भरगच्च वर्क लेहेंग्यावर होतं. 

 

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि रणबीरची सख्खी बहिण रिद्धिमा कपूर साहनी (Ridhima Kapoor Sahani) या दोघी मात्र करिनाच्या तुलनेत बऱ्याच साध्या होत्या. रिद्धिमानेही मनिष मल्होत्रा कलेक्शनची सिक्विन वर्क साडी नेसली होती. तिच्या या साडीची किंमत 1,55,000 रुपये असल्याचं समजतं. तर अभिनेत्री करिश्मा कपूर हिने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसची किंमत ६५ हजारांच्या आसपास होती. तिचा हा ड्रेस फॅशन डिझायनर पुनीत बालाना यांनी डिझाईन केला होता. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकरिना कपूररणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठकरिश्मा कपूर