Lokmat Sakhi >Social Viral > "अपघातानंतर पाठीत भयानक दुखत होतं, तरीही शुटींग केलं, कारण....", हिना खानला का करावं लागलं असं?

"अपघातानंतर पाठीत भयानक दुखत होतं, तरीही शुटींग केलं, कारण....", हिना खानला का करावं लागलं असं?

Actress Hina Khan Explains About Her Accident: कलाकारांचं पडद्यावरचं जगणं तर आपण बघत असतोच. पण पडद्यामागे त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याविषयी सांगते आहे अभिनेत्री हिना खान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 04:19 PM2024-02-26T16:19:16+5:302024-02-26T16:20:12+5:30

Actress Hina Khan Explains About Her Accident: कलाकारांचं पडद्यावरचं जगणं तर आपण बघत असतोच. पण पडद्यामागे त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याविषयी सांगते आहे अभिनेत्री हिना खान..

Actress Hina Khan explains about her accident and a hard life of an actor | "अपघातानंतर पाठीत भयानक दुखत होतं, तरीही शुटींग केलं, कारण....", हिना खानला का करावं लागलं असं?

"अपघातानंतर पाठीत भयानक दुखत होतं, तरीही शुटींग केलं, कारण....", हिना खानला का करावं लागलं असं?

Highlightsहिना जेव्हा तो सीन करत होती, तेव्हा ती पायऱ्यांवरून जोरात सटकली आणि पडली. तिच्या पाठीला चांगलाच मार लागला.

हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) अतिशय गुणी आणि कष्टाळू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने तिचा स्वत:चा एक जबरदस्त फॅन फॉलोईंग तयार केला असून ती सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्ट असण्याचा प्रयत्न करते. आता नुकतीच तिने तिच्या स्वत:च्या अपघाताविषयीची एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. शुटिंगदरम्यान तिचा अपघात कसा झाला, पण तरीही त्यातून सावरून तिला शुटिंगसाठी कसं उभं राहावं लागलं, याविषयी ती सांगते आहे. कलाकाराचं काम आपल्याला वाटतं तेवढं सोपं, सहज नसतं. त्या सहज- सोप्या कामामागे प्रचंड मेहनत असते असं ती त्या पोस्टच्या माध्यमातून सांगते आहे. (Actress Hina Khan explains about her accident and a hard life of an actor)

 

बिगबाॅसफेम मुनव्वर फारुकी याच्यासोबत हिना खानने काही दिवसांपुर्वी एका गाण्याचं शुटिंग केलं होतं. यामध्ये पाऊस पडत आहे आणि ती पायऱ्या उतरून नाचत नाचत येत आहे, असा तो सीन होता. यादरम्यान तिने साडी नेसलेली आहे. तसेच पायात हाय हिल्स आहेत.

उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

कृत्रिम पावसामुळे पायऱ्या अतिशय भिजट आणि स्लिपरी झाल्या होत्या. हिना जेव्हा तो सीन करत होती, तेव्हा ती पायऱ्यांवरून जोरात सटकली आणि पडली. तिच्या पाठीला चांगलाच मार लागला. पण तरीही स्वत:ला सावरत पुढच्या अवघ्या ३० सेकंदात ती त्या शॉटच्या रिटेकसाठी तयार झाली.

 

An Actor’s Life असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते की हवामान कितीही खराब असलं मग ते नैसर्गिक असो की कृत्रित असो, तरी आम्हाला त्यात काम करावंच लागतं.

भलताच प्रयोग! खाऊन पाहिली का कधी मॅगी बिर्याणी? ही व्हायरल रेसिपी पाहून नेटिझन्स म्हणाले....

कारण आम्ही वेळेची कदर करतो. कारण वेळेला किंमत तर असतेच पण अनेक जणांचे कष्टही लागलेले असतात. म्हणूनच आम्ही पडलो, आम्हाला लागलं तरी इतरांच्या वेळेची, त्यांच्या कष्टाची कदर करण्यासाठी आम्हाला एक क्षणही न दवडता उठून आमचं काम करावंच लागतं. कारण काहीही झालं तरी show must go on...आणि माझ्यासाठी हीच खरी कमिटमेंट आहे.. The biggest responsibility of An Actor is not performance.. it’s Commitment! असं म्हणते तिने कलाकारांचं काम प्रत्यक्ष कसं असतं, हे खूप छान सांगितलं आहे...


 

Web Title: Actress Hina Khan explains about her accident and a hard life of an actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.