Join us

गंजलेलं कपाट कमावतंय लाखो लाइक्स, झालंय व्हायरल! तुमच्या घरी आहे का असं लोखंडी कपाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 08:35 IST

A rusty cupboard is earning millions of likes, has gone viral! Do you have such an iron cupboard at home? : साधे, खराब कपाट एवढे व्हायरल कसे झाले. पाहा नक्की काय कारण आहे.

घरात अनेक प्रकारचं सामान असतं. टेबल, खुर्ची, कपाट, पलंग, डबे आणि बरंच काही. अर्थात वेळोवेळी सामान बदलून नवीन आणलं जातं. मात्र मध्यम वर्गीय घरांमध्ये सामान कधीही जून होत नाही. (A rusty cupboard is earning millions of likes, has gone viral! Do you have such an iron cupboard at home?)ते फक्त जरा गंजतं किंवा काही तरी जुगाड करुन त्याची मलमपट्टी केली जाते. मात्र एखादी वस्तू कितीही मोडकळीस आली असली तरी ती फेकून दिली जात नाही. तिचा वापर केला जातोच. अर्थात जुन्या वस्तूंचा दर्जा नव्या वस्तूंपेक्षा जास्त चांगला होता. त्या जास्त टिकाऊ आहेत यात काही वाद नाही. सध्या असेच एक अत्यंत टिकाऊ आणि घरोघरी वापरले जाणारे कपाट सोशल मिडियावर लाखांत लाईक्स मिळवत आहे. 

प्रितिका कोठारी नावाच्या एका मुलीने एक्स या सोशल मिडिया साईटवर घरातल्या एका साध्या जुन्या कपाटाचा फोटो टाकला. त्यावर असे कपाट सगळ्या घरी असतेच असे कॅप्शन लिहिले आहे. तिची ही साधी सिंपल पोस्ट नेटकऱ्यांना मात्र कमालीची आपलीशी वाटली. सगळ्यांना ते कपाट पाहून नॉस्टेलजिक झाल्यासारखे वाटले आणि तिच्या कपाटाच्या फोटोला लाखो लाईक्स आले. लोकांना कमेंट्सवर कमेंट्स करत त्यांच्या घरीही असेच कपाट आहे तसेच त्या कपाटाशी संबंधित किस्सेही सांगायला सुरवात केली. 

अर्थात ही अशी कपाटं वर्षानुवर्षे घराच्या एका कोपऱ्यात राखणदारा प्रमाणे उभी असतात. त्यावर लावलेले स्टिकर्स, आईने चिकटवलेली टिकली, लिपस्टिकचे डाग, बाबांनी लिहिलेल्या तारखा, लहान मुलांनी खेळी मारुन पाडलेले खड्डे आणि त्या कपाटाच्या पायामुळे करंगळीला लागलेली ठेच असे सारेच हा फोटो पाहिल्यावर लोकांना आठवले असावे. त्यामुळे हे जुनाट, गंजलेले कपाट एवढे व्हायरल झाले. 

त्या पोस्ट खाली लोकांनी केलेल्या कमेंट्स एक-एक भन्नाट आहेत. ५९ वर्षांपूर्वी आजोबांना हुंड्यात असेच कपाट मिळाले होते असेही एका नेटकऱ्याने सांगितले. त्याची कमेंटही फार व्हायरल झाली. या कपाटांचा मुख्य उपयोग कपडे ठेवण्यासाठी जरी केला गेला तरी, ही कपाटं फक्त कपडेच सांभाळत नाहीत. तर स्वत:च्या डोक्यावर घरात कमी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, अडगळ तसेच लहान मुलांचा हात पोहचू नये म्हणून लपवलेली खेळणी आणि जळमट सारेच सांभाळतात. मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये घरोघरी अशी जूनी कपाटं असतातच.  

टॅग्स :सोशल व्हायरलगृह सजावटसोशल मीडियाइन्स्टाग्राम