बहुतांश समाजांमध्ये बाळाचे जावळं काढण्याचा म्हणजेच त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढून त्याचं टक्कल करण्याचा एक विधी असतो. तसाच एक विधी राजकोट येथेही एका कुटुंबात पार पडला. पण त्या विधीचं वेगळेपण म्हणजे त्या कुटुंबात फक्त त्या बाळाचंच नाही तर त्याच्यासोबत त्याच्या आई- वडिलांचं आणि त्याच्या आजी- आजोबांचंही मुंडन झालं. म्हणजेच त्यांनीही टक्कल केलं. हे खरंतर खूपच विचित्र आहे. आणि त्यामुळेच कदाचित ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली आहे..
हा एक विधी आहे आणि तो विधीसारखाच होणं अपेक्षित असतं. पण आता मात्र प्रेमाच्या नावाखाली काय वाट्टेल ते केलं जात आहे. कुटुंंबामधल्या लहान मुलांमध्ये सगळ्यांचाच खूप जीव असतो. तसाच या कुटुंबाचाही आहे. त्यामुळेच म्हणे त्यांनी सगळ्यांनी त्या बाळासोबत टक्कल केलं.
कमी वयात मुलींना पाळी येऊ नये म्हणून ५ व्यायाम, रोज करायला लावा- वजनही वाढणार नाही
कारण तो मुंडन करण्यासाठी तयार नव्हता. त्याच्या पालकांचंही टक्कल पाहून तो या विधीसाठी तयार व्हावा आणि त्याला आपणच वेगळे आहोत, ही जाणीव होऊ नये म्हणून त्या सगळ्यांनी टक्कल केलं. प्रेम आहे इथपर्यंत सगळं ठिक आहे. पण म्हणून अख्ख्या परिवारानेच हे पाऊल उचलणं म्हणजे जरा अतिरेकी वाटतं.
मुलांची अशी साथ तुम्ही कुठपर्यंत देणार हा प्रश्नही आहेच. उद्या ते मुल शाळेत जाणार, मग काय अख्खं कुूटूंब त्याच्यासोबत वर्गात जाऊन बसणार का? असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत. त्यापेक्षा मुलांना तो संस्कार का करणं गरजेचं आहे हे समजून सांगा.
अस्सल कोकणी सोलकढीची सोपी रेसिपी- उन्हाळ्यातली खरी मजा, शरीराला मिळेल थंडावा
त्याला त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व पटवून द्या किंवा मग तो जोपर्यंत हो म्हणत नाही, तो पर्यंत त्याचं टक्कल करूच नका.. कारण असं करून त्या प्रथेचा विपर्यास करण्यापेक्षा ते न करणंच जास्त योग्य. मुलांसोबत असं प्रत्येक गोष्टीत वाहात जाण्यापेक्षा त्याला त्यामागची भुमिका स्पष्ट करून सांगणं जास्त बरं नाही का? तुम्हाला काय वाटतं हे सगळं खरंच प्रेमापोटी आहे की त्या निमित्ताने सगळ्याच कुटुंबाला व्हायरल होण्यासाठी मिळालेली एक संधी आहे?
Web Summary : In Rajkot, a family shaved their heads alongside their baby during a traditional hair-cutting ceremony. The parents and grandparents did this to encourage the child, who was hesitant, and to make him feel included. The act has sparked debate online, with some questioning if it's excessive.
Web Summary : राजकोट में एक परिवार ने बच्चे के मुंडन संस्कार में बच्चे के साथ खुद भी सिर मुंडवाया। बच्चे को प्रोत्साहित करने और उसे अलग महसूस न हो इसलिए माता-पिता और दादा-दादी ने ऐसा किया। इस घटना पर सोशल मीडिया पर बहस छिड़ गई है, कुछ लोग इसे अतिरेक बता रहे हैं।