Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेअर स्ट्रेटनिंग तरूणीला पडली महागात, किडनी डॅमेजमुळे हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल-पाहा हे झालं कसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:06 IST

Hair Straightening Side Effects : हे एकमेव प्रकरण नाही. मागील महिन्यात २५ वर्षांच्या एका मुलीलाही हेअर स्ट्रेटनिंगमुळे झालेल्या किडनी डॅमेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Hair Straightening Side Effects : महिला किंवा तरूणी अनेकदा केसांना स्टाइल देण्यासाठी, केसांचं सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट्स करून घेतात. मात्र सुंदर दिसण्याच्या नादात अनेकदा याचा विचारच केला जात नाही की केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स चांगला परिणाम देण्याऐवजी गंभीर आजारही देऊ शकतात. आता हेच बघा ना...अलीकडेच हेअर स्ट्रेटनिंगसाठी पार्लरमध्ये गेलेल्या १७ वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करावं लागलं. ही घटना इस्रायलमधील असून रुग्णालयाच्या अहवालानुसार, त्या मुलीच्या किडन्यांना गंभीर नुकसान झाले आहे. हे एकमेव प्रकरण नाही. मागील महिन्यात २५ वर्षांच्या एका मुलीलाही हेअर स्ट्रेटनिंगमुळे झालेल्या किडनी डॅमेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोणती दिसली लक्षणं?

रिपोर्टनुसार, हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंटनंतर त्या मुलीला सतत उलटी, मळमळ, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणं जाणवत होती. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेस्ट केल्यानंतर समजलं की, तिच्या किडन्या गंभीररीत्या खराब झाल्याचे समोर आले.

हेअर स्ट्रेटनिंग आणि किडनी डॅमेजचा संबंध

नेफ्रोलॉजी इन्स्टिट्यूटच्या प्रमुख प्राध्यापिका लिंडा शावित आणि डॉ. एलोन बेनाया यांनी २०२३ मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात १४ ते ५८ वयोगटातील २६ महिलांची प्रकरणे नोंदवण्यात आली. या महिलांना आधी कोणताही आजार नव्हता. तरीही अचानक त्यांना किडनी फेल्युअरमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष म्हणजे, संशोधकांना आढळलं की या सर्व महिलांनी ग्लायऑक्सिलिक अॅसिडवर आधारित हेअर-स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट करून घेतले होते.

कसा करावा बचाव

जगभरातून अशा अनेक घटना समोर आल्यानंतर काही देशांमध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड असलेली उत्पादने बंद करण्यात आली आहेत. तरीदेखील, त्वचा किंवा केसांवर कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याचे साइड इफेक्ट्स नीट जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच, स्ट्रेटनिंगसाठी वापरण्यात येणारे प्रॉडक्ट थेट स्कॅल्प किंवा केसांच्या मुळांवर लावू नयेत. किमान १.५ सेंटीमीटरचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय, हेअरड्रेसर आणि ग्राहक दोघांनीही प्रॉडक्ट गरम न करणे आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hair Straightening Costs Teen Dearly: Kidney Damage Lands Her in Hospital

Web Summary : A teen's hair straightening treatment led to kidney damage, requiring hospitalization. Studies link glyoxylic acid in straightening products to kidney failure. Experts advise caution with chemical hair treatments, applying products carefully and following instructions.
टॅग्स :आरोग्यब्यूटी टिप्स