Join us

नादच खुळा! ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी केला जबरदस्त डान्स; उर्मिला आणि रेमो म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:16 IST

Grandma's Dance in DID : या शोव्हमधून आलेल्या काही कलाकारांनी विविध क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.

सोशल मीडियावर  रोज नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओज आपल्याला खळखळून हसवतात तर काही व्हिडिओज भावूक असतात. सोशल मीडियावर एका  ७६ वर्षांच्या आजींचा  फोटो व्हायरल होत आहे. या आजींचा डान्स पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले आहेत.  रिएलिटी शोव्ह मध्ये मोठमोठ्या कलाकारांची धांदल उडते. त्यामुळे या आजींचा आत्मविश्वास पूर्ण डान्स चर्चेचा विषय ठरला आहे. रिएलिटी शोव्हच्या स्टेजवर गेलेल्या मराठमोळ्या आजींनी आपल्या नृत्यानं चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या शोव्हमधून आलेल्या काही कलाकारांनी विविध क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. (76 year old marathi Grandmaa dance in DID  show moms her dance goes viral on social media)

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका ७६ वर्षांच्या आजीबाईचा डान्स पाहून परिक्षक अवाक झाले. या आजींचे नाव लक्ष्मी असं आहे. हा व्हिडियो सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. डान्स इंडिया डान्सच्या स्टेजवर या आजींचा अविष्कार पाहायला मिळाला.  आजी परीक्षक रेमो डिसुझा, उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री या तिघांसोबत कमालीचा डान्स करत असल्याचं दिसत आहे.

हृदयद्रावक! आईच्या निधनानंतर शाळेत आलेल्या मित्राला पाहून संपूर्ण वर्गाला कोसळलं रडू

प्रेक्षकांसोबत परीक्षकही ७६ वर्षीय या आजींचा डान्स पाहून चांगलेच चक्रावून गेले आहेत. या व्हिडिओवर कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  ‘एज इस जस्ट नंबर’ असं म्हणत एकानं आजीच्या उत्साहाचं कौतुक केलं आहे. '७६वर्षांच्या आज्जी की तरुणी? व्वा आज्जी कमाल केली.' असं म्हणत एका सोशल मीडिया युजरनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल