Join us  

लाईटबील कमी येण्यासाठी ५ गोष्टी करा; उन्हाळ्यात पंखा-एसीचा वापर वाढला तरी बिल येईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:21 PM

5 Ways To Reduce Electricity Bill (Light Bill Kami Yenyasathi kay Karave) : ऊन्हाळ्याच्या दिवसांत एसी, फॅन जास्तवेळ चालवल्यामुळे बीलात वाढ होते.

सुरूवातीच्या काळात टिव्ही, फ्रिज, मशिन्स यांसारखे अप्लायंसेस प्रत्येक घरात नसायचे. आता लोकांच्या घरी वॉशिंग मशिन, मायक्रोव्हेव्ह, ओव्हन किवा एअर फ्रायर टोस्टरसुद्धा असतो. (Electricity Bill Saving Tips) याव्यतिरिक्त रूम हिटर, एसीची सुद्धा आवश्यकता असते. वाढतं लाईटबील बघून अनेकांना टेंशन येतं. (Five Ways To Reduce Electricity Consumption At Home) ऊन्हाळ्याच्या दिवसांत एसी, फॅन जास्तवेळ चालवल्यामुळे बीलात वाढ होते.

रोजच्या वापरात काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली तर लाईटबिल जास्त येणारच नाही आणि विजेचीही बचत होईल. जुने झालेले पंखे, फ्रिज किंवा इतर मशिन्स लाईट बील जास्त वाढवतात. (Light Bill Saving Tips) बाजारात सध्या एनर्जी इफिशिएंट ५ स्टार रेटींगचे अप्लायंसेस आले आहेत ज्यामुळे विचेची बचत होण्यास मदत होते. (5 Ways To Reduce Electricity Bill At Home)

१) ऑफ  करायला विसरू नका

टाटा पॉव्हरच्या रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही खोलीच्या बाहेर निघता तेव्हा लाईट किंवा इतर इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू बंद करायला विसरू नका. फोन चार्जर, लॅपटॉप या डिव्हाईसचा वापर होत नसेल आणि स्विच ऑन असेल तरीही  बील  येत जातं. म्हणून वापर झाल्यानंतर बटन्स बंद करायला विसरू नका. चार्जिंग झाल्यानंतर  बटन्स न विसरता बंद करा.

२) बल्ब चेंज करा

एलईडी लाईट बल्ब ट्रेडिशनल बल्बच्या तुलनेत विचेची बचत करतात. ज्यामुळे लाईटबील कमी  येते आणि दीर्घकाळ चालतात ज्यामुळे लाईट्ससाठी वारंवार पैसे घालवावे लागत नाहीत. 

३) चार्जर, पीसी ऑफ करा

कंम्प्यूटरवर काम केल्यानंतर नेहमी पॉवर स्विच ऑफ करा. याव्यतिरिक्त मोबाईल चार्जर ऑन करून ठेवू नका ज्यामुळे  लाईटबील जास्त येते. याशिवाय स्टॅण्डबाय मोडवर ठेवू नका. 

ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी

४) एसीची सेटिंग

जेव्हा ऊन्हाळा सुरू होतो तेव्हा एसी, कुलरची गरज लागतेच. अशावेळी लाईटबील खूप जास्त येऊशकतं. अशावेळी तुम्हाला लाईटबील कमी करण्यासाठी  काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील जसं की २४ डिग्रीवर एसी सुरू ठेवा. जेणेकरून वेळोवेळी ऑफ होत राहील.

कितीपण खा वजनच वाढत नाही-हडकुळे दिसता? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भरपूर ताकद येईल

५) ५ -स्टार रेडेट फ्रिज

आपल्या घरातील जुन्या वस्तू अपग्रेड करून तुम्ही जवळपास ४० टक्के वीज वाचवू शकता.  जर तुम्ही साधारण फ्रिजऐवजी ५ स्टार रेटेड फ्रिजची निवड केली तर विजेचे बील ३० टक्क्यांनी कमी होईल. जुन्या फ्रिजमध्ये वारंवार  प्रोब्लेम्स उद्भवतात कधी जास्त बर्फ तयार होतो तर कधी कुलिंग व्यवस्थित होत नाही अशावेळी तुम्ही नवीन फ्रिज घेण्याचा विचार केलात तर पैसे आणि वीज  दोन्हींची बचत होईल.

टॅग्स :समर स्पेशलहेल्थ टिप्सआरोग्य