Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > रात्री किचनमध्ये खूप झुरळं फिरतात? ५ पदार्थ ओट्यावर ठेवा, झुरळं दिसणं कायमचं बंद

रात्री किचनमध्ये खूप झुरळं फिरतात? ५ पदार्थ ओट्यावर ठेवा, झुरळं दिसणं कायमचं बंद

5 Ways To Get Rid Of Cockroaches : (Zural Kami Karnyasathi Upay) झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:15 IST2026-04-09T16:32:55+5:302026-04-09T17:15:23+5:30

5 Ways To Get Rid Of Cockroaches : (Zural Kami Karnyasathi Upay) झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

5 Ways To Get Rid Of Cockroaches From Your Home Forever | रात्री किचनमध्ये खूप झुरळं फिरतात? ५ पदार्थ ओट्यावर ठेवा, झुरळं दिसणं कायमचं बंद

रात्री किचनमध्ये खूप झुरळं फिरतात? ५ पदार्थ ओट्यावर ठेवा, झुरळं दिसणं कायमचं बंद

घरात झुरळं दिसणं ही एक सामान्य समस्या आहे पण याकडे  दुर्लक्ष करणं मोठ्या समस्येचं कारण ठरू शकतं. आकाराला छोटी दिसणारी झुरळं एकदा घरात शिरली की हळहूळू वाढत जातात.  अन्न दुषित करण्याोसबत झुरळं  काही बॅक्टेरियाजही पसरवतात ज्यामुळे किचनच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो (5 Ways To Get Rid Of Cockroaches From Your Home Forever).

बरेच लोक झुरळांना पळवून लावण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे वापरतात. हे स्प्रे मारल्यानंतर तेव्हढ्यापुरता झुरळं कमी होतात नंतर पुन्हा झुरळं दिसायला सुरूवात होते. वारंवार स्प्रे विकत घ्यावे लागतात. झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Remove Small Cockroaches From Home)

किचनमध्ये ज्या ठिकाणी अन्नाचे लहान लहा कण असतात तिथे झुरळं जास्त फिरतात. फ्रिजच्या मागे, कपाटांच्या कानाकोपऱ्यातही झुरळं लपतात. वेळीच लक्ष  दिले नाही तर झुरळांची संख्या वाढते. वेळीच काही सोपे घरगुती उपाय केले तर झुरळांना मुळापासून नष्ट करण्यास मदत होते तसंच झुरळांचा शिरकावही कमी होतो. (How To Remove Cockroaches From Home Naturally)

झुरळांना पळवून लावण्याचे 5 सोपे उपाय (5 Best Ways To Get Rid Of Cockroaches)

1) बेकींग सोडा आणि साखर (Baking Soda And Sugar)

झुरळं कमी करण्यासाठी तुम्ही बेकींग सोडा आणि साखरेचं मिश्रण वापरू शकता. दोन्ही पदार्थ समान प्रमाणात मिसळून अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळं जास्त येतात. साखरेचा गोडवा झुरळांना आकर्षीत करेल आणि बेकींग सोडा झुरळांना दूर पळवेल.

2) तेजपत्ता (Bay Leaf)

किचनमध्ये स्वंयपाकासाठी वापरला जाणारा तेजपत्ता झुरळांना पळवू शकतो. तेजपत्त्याचा तीव्र वास झुरळांना अजिबात आवडत नाही. तेजपत्ता वाटून किचनच्या कानाकोपऱ्यात ठेवा. ज्यामुळे झुरळं पळून जाण्यात मदत होईल.

3) कडूलिंब (Neem)

कडूलिंबात असे काही गुण असतात जे किटकांना दूर पळवण्यास मदत करतात. कडुलिंबाची पानं सुकवून त्याची पावडर बनवून अशी ठिकाणी शिंपडा जिथे सर्वात जास्त झुरळं येतात.

4) पुदिन्याच्या तेलाचा स्प्रे (Pudina Oil Sprey)

पुदीन्याच्या तेलाचा सुगंध झुरळांना अजिबात आवडत नाही. पाण्याचे काही थेंब मिसळून स्प्रे तयार करा आणि किचनच्या कानाकोपऱ्यात शिंपडा हा एक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे.

5) कांदा आणि लसूण (Onion And Garlic)

कांद्याचा आणि लसणाचा तीव्र वास झुरळांना अजिबात आवडत नाही.  कांदा आणि लसणाची पेस्ट तयार करून पाण्यात ही पेस्ट मिसळून झुरळं ज्या ठिकाणी दिसतात तिथे हे पाणी स्प्रे करा. ज्यामुळे झुरळं हळूहळू कमी होतील. हे सर्व उपाय  करण्यासोबत घराची नियमित साफसफाई करणं, कचरा वेळेवर फेकणं, किचन स्वच्छ आणि कोरडं ठेवणं खूप महत्वाचं आहे. ज्यामुळे झुरळं आपोआपचं कमी होतील.

Web Title : कॉकरोच भगाओ: कीट-मुक्त घर के लिए 5 रसोई सामग्री

Web Summary : कॉकरोच भोजन को दूषित करते हैं और बैक्टीरिया फैलाते हैं। उन्हें प्राकृतिक रूप से दूर भगाने के लिए बेकिंग सोडा, तेज पत्ता, नीम, पुदीना तेल या प्याज-लहसुन का पेस्ट इस्तेमाल करें। नियमित सफाई जरूरी है।

Web Title : Eradicate Cockroaches: 5 Kitchen Ingredients for a Pest-Free Home

Web Summary : Cockroaches contaminate food and spread bacteria. Use baking soda, bay leaves, neem, peppermint oil, or onion-garlic paste to repel them naturally. Regular cleaning is essential.