प्रत्येकाच्याच घरात रोज सकाळी चहा बनतो. चहा केल्यानंतर गाळणीत राहिलेली चहा पावडर फेकून दिली जाते. उरलेली चहा पावडर तुम्ही घरच्या कामांसाठी वापरू शकता (Home Hacks). बागेतील रोपांसाठी चहा पावडर तुम्ही खत म्हणून घालू शकता फक्त गार्डनिंगच नाही तर इतर अनेक कामांसाठी चहा पावडरचा वापर केला जातो (5 Uses Of tea leaves). चहातील एंटी ऑक्सिडेंट्स, कॅफेन आणि टॅनिन यांसारखे तत्व इतर कामांसाठीही उपयुक्त ठरतात. वापरलेल्या चहा पावडरचा तुम्ही अनेक प्रकारे वापर करू शकता. त्यासाठी काही खास पद्धतींनी चहा पावडरचा वापर करायला हवा. (Use Leftover Tea Leaves For Hairs)
केसांना नैसर्गिक चमक मिळते
चहा पावडरचा वापर करून तुम्ही केसांना शाईन देऊ शकता. यासाठी वापरलेली चहा पावडर पुन्हा पाण्यात उकळवून थंड करू घ्या. हे पाणी केस धुताना केसांवर घाला आणि ५ ते १० मिनिटं तसंच राहू द्या. नंतर साध्या पाण्यानं केस धुवा. त्यामुळे केसांना नॅच्युरल शाईन आणि स्मूदनेस येतो.
रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर
चहा पावडरचा वापर तु्म्ही इतर रोपांसाठीही करू शकता. सगळ्यात आधी चहा पावडर कुंडीच्या मातीत घाला. यातील नायट्रोजन आणि मिनरल्स केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. यामुळे रोपांची माती टिकाऊ बनते आणि रोपं बहरेलेले राहतात. (Ref)
फरशी स्वच्छ होते
चहा पावडरचा वापर करून तुम्ही फरश्या आणि भांड्यांची सफाई करू शकता. यासाठी चहा पावडरचं पाणी उकळवून थंड करून नंतर या पाण्यानं फरशी स्वच्छ करा. यामुळे फरश्यांची चमक वाढते आणि घाण सहज दूर होण्यास मदत होते.
डार्क सर्कल्स कमी होतात
चहाच्या बॅग्स थंड करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डार्क सर्कल्स आणि सूज कमी होते. ही एक नॅच्युरल आणि स्वस्त ब्युटी ट्रिटमेंट आहे. ज्याचा वापर लोक करतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते.
दुर्गंध कमी होण्यास मदत
सुकलेल्या चहा पावडरचा वापर करून तुम्ही फ्रिज किंवा बुटांचा दुर्गंध दूर करू शकता. यामुळे घरातील दुर्गंध कमी होतो. वापरलेली चहा पावडर किचनमधील इतर वास आणि कांद्याचा वास कमी करण्यासाठीसुद्धा फायदेशीर ठरते.