Lokmat Sakhi >Social Viral > किचनमधलं काम झटपट आणि स्वच्छ करणाऱ्या ५ किचन टिप्स- खात्री आहे ‘हे’ तुम्हाला माहिती नसेल!

किचनमधलं काम झटपट आणि स्वच्छ करणाऱ्या ५ किचन टिप्स- खात्री आहे ‘हे’ तुम्हाला माहिती नसेल!

5 kitchen tips - I'm sure you didn't know 'these'! : काम झटपट आणि स्वच्छ होण्यासाठी या टिप्स पाहा. साध्या सोप्या आणि उपयुक्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 20:18 IST2025-03-12T20:16:49+5:302025-03-12T20:18:55+5:30

5 kitchen tips - I'm sure you didn't know 'these'! : काम झटपट आणि स्वच्छ होण्यासाठी या टिप्स पाहा. साध्या सोप्या आणि उपयुक्त.

5 kitchen tips - I'm sure you didn't know 'these'! | किचनमधलं काम झटपट आणि स्वच्छ करणाऱ्या ५ किचन टिप्स- खात्री आहे ‘हे’ तुम्हाला माहिती नसेल!

किचनमधलं काम झटपट आणि स्वच्छ करणाऱ्या ५ किचन टिप्स- खात्री आहे ‘हे’ तुम्हाला माहिती नसेल!

स्वयंपाकघर अशी एकमेव जागा आहे जेथील काम कधीच संपत नाही. एक झालं की दुसरं लगेच करायला घ्यायचं. काही ना काही सतत चालूच असतं.(5 kitchen tips  - I'm sure you didn't know 'these'!) जेवण तयार करण्यापासून स्वयंपाकघर स्वच्छ करण्यापर्यंत सगळीच काम सातत्याने चालू असतात. (5 kitchen tips  - I'm sure you didn't know 'these'!)ही कामं पटकन व्हावी यासाठी वेगवेगळ्या टिप्स वापरता येतात. ज्या तुमचा वेळ वाचवू शकतात आणि स्वच्छता करण्यातही तुम्हाला मदत करू शकतात.
  


१.भाज्या चिरण्यासाठी जवळपास सर्वच जण आता चॉपिंग बोर्ड वापरतात. त्यामुळे भाज्या चिरण्यामध्ये गती तर येतेच पण ओटाही खराब होत नाही. (5 kitchen tips  - I'm sure you didn't know 'these'!)मध्यंतरी एक व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. ज्यामध्ये प्लॉस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरताना त्याचे कण भाजीमध्ये मिक्स होतात असे सांगितले होते. त्यानंतर लोकांनी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणं सुरू केलं. हा बोर्ड फायदेशीर तर आहे मात्र तो साफ करणं जरा कठीण जाते कारण, तुम्ही तो चुकीचा साफ करत आहात. लाकडाचा बोर्ड साफ करताना त्यावर थोडं पाणी लावा. नंतर मीठ आणि बेकिंग सोडा त्यावर टाका नंतर लिंबाने तो बोर्ड स्क्रब करून घ्या. मस्तपैकी साफ होईल.   

२.लसूण सोलणे हे फारच वैतागवाणं काम आहे. लसूण सोलताना नखांमध्येही अडकतो. चटणी करताना वगैरे जरा जास्त लसूण सोलावा लागला तर नखे झोंबायला लागतात. नरमही होतात. लसूण सोलण्यासाठी जास्त कष्ट करायचे नसतील तर, सुरीचा वापर करा. सुरीने लसणाच्या पाकळीचे वरचे टोक कापायचे बाकी सालं आरामात निघतात. दुसरा उपाय म्हणजे जसा आपण पांढरा कांदा फोडतो त्याच प्रकारे हाताने लसूण फोडून घ्यायचा. असं केल्याने त्याची सालं मोकळी होतात. सोलायला सोपं पडतं. 

३.स्वयंपाकघरामध्ये भांडी पुसायला आपण जे फडके वापरतो, त्याला काही दिवसांमध्येच फार घाण वास यायला लागतो. भाज्या पुसायचा फडका तर आणखीच जास्त खरब होतो. त्यांचा वासही गायब होईल आणि अगदी नव्यासारखे दिसतील फक्त या पद्धतीने धुवा. गरम पाण्यामध्ये थोडं डिटर्जंट घाला. त्यात लिंबू पिळा आणि त्या गरम पाण्यामध्ये फडकी भिजवून ठेवा. नंतर साध्या पाण्यातून काढा. आणि घट्ट पिळून वाळत घाला. सगळा वास जातो डागही जातात.  

४.ओटा पुसताना अन्न कण ओट्याच्या कडांपाशी जाऊन अडकतात. ते निघता निघत नाहीत. त्यावरून फडका मारला तर ते आणखी आत जातात. तसेच राहीले की कुजतात. ओटा साफ करून झाल्यावर जुन्या ब्रशचा वापर करून ओट्याच्या कडा घासायच्या. अडकलेली घाण निघून जाते. 

५.अनेकदा बेसिनचे नळ साफ करायला आपण विसरतो. त्यावर साबणाचे, पाण्याचे डाग असतात. हळूहळू ते डाग पांढरे होतात. ते दिसायला फारच घाण दिसतात. असे नळ साफ करण्यासाठी लिक्विड सोपमध्ये थोडा बेकिंग सोडा घालायचा. त्यानंतर त्या मिश्रणाने नळ पुसून काढायचे. मस्त चकचकीत होतात.

Web Title: 5 kitchen tips - I'm sure you didn't know 'these'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.