Kitchen Tips For Summer : सकाळचा चहा, रात्रीची भांडी, पती-मुलांचे टिफिन, सासू-सासऱ्यांचा नाश्ता त्यानंतर दुपारचं जेवण अशा एक एक गोष्टी करत करत घरी राहणाऱ्या महिलांचा पूर्ण दिवस किचनमध्ये जातो. इतर ऋतुंमध्ये तर किचनमध्ये जास्त वेळ थांबण्यास काही वाटत नाही. पण उन्हाळा की, किचनमध्ये काम करताना विटांच्या भट्टीमध्ये काम करत असल्यासारखं वाटतं. आधीच उन्हाचा पारा वाढला की घराचं तापमान वाढतं, त्यात गॅसची उष्णता म्हणजे कहरच. अशात या दिवसांमध्ये किचनमधून कधी एकदाचे बाहेर पडते असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. मात्र, काही अशाही गोष्टी आहेत ज्यांद्वारे तुम्ही किचनमधील तापमान थोडं कमी करू शकता. जेणेकरून तुमची महत्वाची कामे होईपर्यंत तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.
एक्झॉस्ट फॅन
आजकालच्या मॉडर्न किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन तर असतोच असतो, किचनमधील हा फॅन रूममधील उष्णता कमी करण्याचं काम करतो. तसा इतर वेळी हा फॅन ऑन करण्याची फारशी गरज पडत नाही. पण उन्हाळ्यात मात्र याचा वापर सतत केला पाहिजे. तसेच दारं खिडक्याही उघड्या ठेवा.
लवकर तयार होणाऱ्या डिश
किचनमधील गरमीमध्ये घामाघूम व्हायचं नसेल तर तुम्ही थोडा काही वेगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ किचनमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. यातील एक महत्वाचा मुद्दा हा ठरू शकतो की, तुम्ही असं जेवण किंवा पदार्थ बनवा जे तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही. जास्त अवघड किंवा वेळखाऊ करू नका. यानं तुमचा वेळही वाचेल आणि तुम्ही घामाघुमही होणार नाही.
स्वयंपाकाची वेळ बदला
सामान्यपणे प्रत्येक घरांमध्ये दिवसातून तीन वेळा खायला बनवलं जातं. जर तुम्हीही असं करत असाल तर हे बनवण्याची वेळ तुम्ही बदलू शकता. सामान्यपणे १० ते ११ पासून उन्हाचा पारा वाढणं सुरू होतं. शक्य असेल तर त्याआधी म्हणजे सकाळी सकाळीच तुम्ही ही जास्त वेळ लागणारी काम निपटवू शकता. ५ ते १० मिनिटं वेळ लागणारी कामे तुम्ही नंतरही हाती घेऊ शकता.
स्वयंपाकाआधीची तयारी
स्वयंपाक सुरू करण्याआधीच बरीच बारीक सारीक कामे करावी लागतात. जसे की, भाजी साफ करणं, डाळी निसून घेणं, कांदा-मिरच्या कापणं या गोष्टी धुवून घेणं ही कामे करता करताच जास्त वेळ निघून जातो. अशात ही बारीक सारीक कामे किचनमध्ये न जाताही तुम्ही करून ठेवू शकता. जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा या गोष्टी रेडी असतील तर तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळ थांबावं लागणार नाही.
इनडोअर प्लांट्स
अनेकांना घराच्या बाल्कनीमध्ये झाडी लावण्याची आवड असते. अशात तुम्ही किचनमधील किंवा एकंदर घरातील वातावरण थंड आणि चांगलं ठेवण्यासाठी मदत मिळू शकते. कुंड्यांमध्ये काही झाडं लावून किचनमध्ये ठेवा. यानं थंडही वाटेल आणि चांगलही वाटेल.