Lokmat Sakhi >Social Viral > रोज कुकर लावताना ४ गोष्टी नक्की तपासा, कुकरचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोका टळेल 

रोज कुकर लावताना ४ गोष्टी नक्की तपासा, कुकरचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोका टळेल 

4 Major Reasons for Pressure Cooker Blast: प्रेशर कुकरचा स्फोट होऊ नये म्हणून काही गोष्टी रोजच्या रोज तपासून घेतल्या पाहिजेत...(how to avoid pressure cooker blast?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 16:13 IST2025-08-28T15:12:55+5:302025-08-28T16:13:35+5:30

4 Major Reasons for Pressure Cooker Blast: प्रेशर कुकरचा स्फोट होऊ नये म्हणून काही गोष्टी रोजच्या रोज तपासून घेतल्या पाहिजेत...(how to avoid pressure cooker blast?)

4 major reasons for pressure cooker blast, how to avoid pressure cooker blast? | रोज कुकर लावताना ४ गोष्टी नक्की तपासा, कुकरचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोका टळेल 

रोज कुकर लावताना ४ गोष्टी नक्की तपासा, कुकरचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोका टळेल 

Highlightsआपल्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर रोजच्या रोज कुकर लावताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तपासून पाहा.

कुकर ही तशी आपल्या स्वयंपाक घरातली अगदी नेहमीच्या वापराची वस्तू. काही काही घरांमध्ये तर अगदी रोजच्या रोज वरण भाताचा कुकर लावला जातो. याशिवाय एखादा पदार्थ उकडण्यासाठी, आता सणासुदीच्या दिवसांत पुरण शिजविण्यासाठीही कुकर लावला जातो. अगदी सहजपण आपण कुकर लावतो पण कधी कधी मात्र त्याचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोकाही असताे. तशा कित्येक बातम्या नेहमीच आपल्या कानावरही येत असतात (4 major reasons for pressure cooker blast). असं आपल्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर रोजच्या रोज कुकर लावताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तपासून पाहा. यामुळे दुर्घटना टळू शकतो.(how to avoid pressure cooker blast?)

 

प्रेशर कुकरचा स्फोट होऊ नये म्हणून काेणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

१. कधी कधी आपल्याला नेहमीपेक्षा थोडा जास्त स्वयंपाक करायचा असतो. अशावेळी आपल्या कुकरची क्षमता लक्षात न घेता आपण त्याच्यामध्ये भरपूर पदार्थ शिजवण्यासाठी घालतो. यामुळे कुकर गरजेपेक्षा जास्त भरतं आणि झाकणातून वाफ बाहेर पडणं बंद होतं. आतल्या आता वाफ अडकते आणि त्यामुळे मग कुकरचा स्फोट होतो.

वजन आणि शुगर वाढण्याच्या भीतीने मोदक खाणं टाळताय? वाचा ऋजुता दिवेकरांचा खास सल्ला

२. कुकरमध्ये जर अन्न शिजायला लावताना त्यात गरजेपेक्षा खूप कमी पाणी घातलं तरीही अन्न जळून कुकरचा स्फोट होण्याचा धोका असतो.

 

३. कुकरची स्वच्छता आपण रोजच्या रोज करतो पण तरीही ती बऱ्याचदा ती फक्त वरवरची असते. कुकरचं झाकण व्यवस्थित साफ झालं पाहिजे. कारण अन्न शिजत असताना शिट्टी होऊन जिथून वाफ बाहेर जाते त्या ठिकाणी जर घाण अडकून राहिली तर वाफ आतल्याआत राहाते आणि स्फोट होण्याचा धोका वाढतो.

सकाळी उठल्याउठल्या अंग आखडल्यासारखं वाटतं? ५ गोष्टी करा, शरीर होईल कापसासारखं हलकं

४. कुकरच्या झाकणाला असणारं गॅस्केट, कुकरची शिट्टी यामध्ये थोडीशी जरी समस्या वाटली तरी अगदी लगेचच्या लगेच कुकर दुरुस्त करून घेतलं पाहिजे. त्याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये. 

 

Web Title: 4 major reasons for pressure cooker blast, how to avoid pressure cooker blast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.