Join us
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींच्या हातात दिसल्या ३ गोष्टी, प्रचारात अंगावर हे काय असा प्रश्न सर्वांना - किंमत लाखो रुपये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2026 16:30 IST

3 Gadgets Spotted on Mamata Banerjee’s Wrist During Campaign Spark Curiosity – Worth Lakhs of Rupees : ममता बॅनर्जी आणि इतरही लोकं वापरत असलेली ही नक्की काय गॅजेट्स आहेत ?

ममता बॅनर्जी अलीकडे एकाच वेळी अनेक फिटनेस डिव्हाइसेस वापरताना दिसल्या, स्मार्टवॉच, व्हूप बँड आदी. त्याच्या या विविध वेअरेबल्सकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. आज अनेक खेळाडू, व्यावसायिक आणि सेलिब्रिटी एकाच वेळी दोन-तीन फिटनेस डिव्हाइसेस वापरताना दिसतात. या वाढत्या ट्रेंडमागचं मुख्य कारण म्हणजे विशेष कामासाठी वेगळं डिव्हाइस आणि सगळ्या सुविधा एकाच गॅज्डजेटमध्ये. (3 Gadgets Spotted on Mamata Banerjee’s Wrist During Campaign Spark Curiosity – Worth Lakhs of Rupees)काही डिव्हाइसेस केवळ शरीराची सखोल माहिती देण्यासाठी तयार केलेली असतात, तर काही डिव्हाइसेस दैनंदिन वापरासाठी अधिक सोयीस्कर असतात.

व्हूप बँड हे डिव्हाइस पूर्णपणे परफॉर्मन्स ट्रॅकिंगवर लक्ष केंद्रित करतं. यात स्क्रीन किंवा नोटिफिकेशन्स नसतात. त्याऐवजी हे झोपेची गुणवत्ता, शरीरावरचा ताण, हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आणि रिकव्हरी यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी सातत्याने मोजतं. त्यामुळे शरीराची सखोल माहिती मिळते आणि फिटनेसकडे अधिक वैज्ञानिक पद्धतीने पाहता येतं. दुसरीकडे अॅपल वॉच सारखी स्मार्टवॉच ही ऑल-इन-वन डिव्हाइस असतात. ती फिटनेस ट्रॅकिंगसोबतच कॉल्स, मेसेजेस, नोटिफिकेशन्स आणि अ‍ॅप्ससारख्या सुविधा देतात. त्यामुळे ती दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त ठरतात.

त्यासारख्याच स्मार्ट रिंग्सही लोकप्रिय होत आहेत. या अगदी हलक्या आणि नजरेत न येणाऱ्या असतात, पण २४ तास सतत शरीरावर लक्ष ठेवतात. विशेषतः झोप आणि रिकव्हरी मोजण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात. मुख्य प्रश्न म्हणजे यांची गरज आहे का ? खरंतर तेवढी गरज नाही पण ज्यांना आवडतं आणि ज्यांना ते विकत घेणं शक्य आहे त्यांनी त्याचा वापर करण्यात काहीच चुकीचं नाही. 

अनेकजण एकाच वेळी वेगवेगळी डिव्हाइसेस वापरण्यामागचं कारण म्हणजे प्रत्येक डिव्हाइस वेगवेगळ्या प्रकारचा डेटा देतं. काही डिव्हाइसेस फक्त आरोग्य आणि परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करतात, तर काही डिव्हाइसेस दैनंदिन जीवनातील सोयी वाढवतात. त्यामुळे काही लोक दोन्ही प्रकारची माहिती एकत्र मिळवण्यासाठी एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस वापरताना दिसतात. वेअरेबल तंत्रज्ञान हे वाढतं क्षेत्र आहे. त्यात विविध नवीन उपकरणं येतच असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee's gadgets spark curiosity: Fitness tech worth lakhs?

Web Summary : Mamata Banerjee spotted with multiple fitness devices, raising eyebrows. Trend driven by specialized tracking and all-in-one convenience. Devices offer diverse data, combining health insights with daily functionality. Wearable tech continues to evolve.
टॅग्स :ममता बॅनर्जीसामाजिकसोशल व्हायरलमाध्यमेफिटनेस टिप्सतंत्रज्ञान