Lokmat Sakhi >Social Viral > किचन ओटा तेलकट - मेणचट झाला, डाग निघत नाहीत? २ उपाय ओटा झटक्यात होईल स्वच्छ चकचकीत

किचन ओटा तेलकट - मेणचट झाला, डाग निघत नाहीत? २ उपाय ओटा झटक्यात होईल स्वच्छ चकचकीत

2 solutions to make your countertops clean and shiny : ओटा स्वच्छ करण्यासाठी वापरा हे सोपे उपाय. सगळे डाग होतील गायब.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 14:20 IST2025-04-13T14:19:20+5:302025-04-13T14:20:35+5:30

2 solutions to make your countertops clean and shiny : ओटा स्वच्छ करण्यासाठी वापरा हे सोपे उपाय. सगळे डाग होतील गायब.

2 solutions to make your countertops clean and shiny | किचन ओटा तेलकट - मेणचट झाला, डाग निघत नाहीत? २ उपाय ओटा झटक्यात होईल स्वच्छ चकचकीत

किचन ओटा तेलकट - मेणचट झाला, डाग निघत नाहीत? २ उपाय ओटा झटक्यात होईल स्वच्छ चकचकीत

घरामध्ये पसारा असला की काही काम करायचे मनच होत नाही. पसारा आवरला की जरा प्रसन्न वाटते. (Kitchen countertops are oily and waxy, stains won't come off? 2 solutions to make your countertops clean and shiny in no time)तसेच स्वयंपाकघरात भांडी पसरलेली असतील तरी ती पटापट आवरून नंतरच आपण कामाला सुरवात करतो. या सगळ्या चांगल्या सवयी पाळल्या तरी अनेकदा खराब ओट्यावर नाइलाजाने काम करावे लागते.(Kitchen countertops are oily and waxy, stains won't come off? 2 solutions to make your countertops clean and shiny in no time)

ओट्यावर साचलेली घाण तसेच डाग जाता जात नाहीत. तेलाचे डाग असतील गोडाचे डाग असतील किंवा मग आमटी वरणाचे डाग असतील, ते काढणे कठीण काम होऊन बसते. (Kitchen countertops are oily and waxy, stains won't come off? 2 solutions to make your countertops clean and shiny in no time)परंतु काही सोप्या टिप्स वापरल्याने हे काम अगदी आरामात करता येऊ शकते. पाहा ओटा साफ करण्यासाठी काय उपाय करु शकता.

१. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

ओट्यावर व्हिनेगर शिंपडा. त्यावरती थोडा बेकिंग सोडा पसरवा. जास्त प्रमाणामध्ये सोडा वापरा. व्हिनेगर ओट्याच्या कोपऱ्यांनाही लागेल याची काळजी घ्या. दोन्ही पदार्थांच्या मिश्रणामुळे जरा फेस होईल. तो फेस स्क्रबरच्या मदतीने स्क्रब करा. ओटा व्यवस्थित साफ करा. थोडा वेळ तसाच ठेवा नंतर ओटा पाण्याने धुऊन टाका.

२. लिंबाचा रस आणि मीठ

लिंबाचा रस काढून घ्या. त्यामध्ये थोडे मीठ घाला. व्यवस्थित मिक्स करा. आणि लिंबाची पिळलेली फोड वापरून ओटा स्क्रब करा. लिंबू रस व मीठाच्या मिश्रणात ती फोड बुडवा आणि ओट्यावर फिरवा. थोड्या वेळाने कोमट पाण्याचा वापर करा आणि ओटा स्वच्छ पुसून घ्या. लिंबातील आम्लाचा मीठाशी संयोग झाल्यावर तयार होणाऱ्या मिश्रणामुळे डाग लगेच निघतात. 
 
हे उपाय तर फायद्याचे ठरतातच, मात्र रोज ओटा साफ करताना आपण फडक्याचा वापर करतो. फडक्याने अन्न कण ओट्याच्या कडांशी सारतो. त्यामुळे कण तेथे अडकतात. ओटा साफ करताना सरळ रेषेत पाणी ओता आणि फडकेही त्याच दिशेने फिरवा. कडांच्या दिशेने अन्न कण लोटू नका.

आठवड्यातून दोनदा तरी ओटा गरम पाण्याने पुसा. चिकट डाग तसेच तेलकटपणा आरामात निघून जातो. गरम पदार्थ थेट ओट्यावर ठेऊ नका. त्यामुळेही ओट्याला डाग लागतात. हॉटप्लेटचा वापर करा.   

Web Title: 2 solutions to make your countertops clean and shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.