Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकघरात झुरळं फिरतात? किचनमध्ये ठेवा '२' मसाले; झुरळं होतील झटक्यात गायब

स्वयंपाकघरात झुरळं फिरतात? किचनमध्ये ठेवा '२' मसाले; झुरळं होतील झटक्यात गायब

2 Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : किचनमधली बारीक झुरळं कमीच होत नाहीत? २ सोपे उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 11:02 AM2024-06-10T11:02:23+5:302024-06-10T14:31:21+5:30

2 Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently : किचनमधली बारीक झुरळं कमीच होत नाहीत? २ सोपे उपाय करून पाहा..

2 Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently | स्वयंपाकघरात झुरळं फिरतात? किचनमध्ये ठेवा '२' मसाले; झुरळं होतील झटक्यात गायब

स्वयंपाकघरात झुरळं फिरतात? किचनमध्ये ठेवा '२' मसाले; झुरळं होतील झटक्यात गायब

स्वयंपाकघरात खरकटी भांडी, अन्नकण पडलेले असले की लगेच झुरळं येतात (Cockroaches). कितीही किचन स्वच्छ ठेवलं तरी, झुरळांचा वावर तिथे वाढतोच. या झुरळांना पळवून लावण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत (Kitchen Tips). पण केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या संपर्कात आल्यानं तब्येत बिघडू शकते (Cleaning Tips).

जर आपल्याला केमिकल उत्पादनांचा वापर करायचं नसेल तर, घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे झटक्यात झुरळं गायब होतील, शिवाय पुन्हा किचनमध्ये फिरकणारही नाहीत. पण झुरळांना पळवून लावण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांचा वापर करावा? पाहा(2 Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently).

झुरळांना पळवून लावणारे घरगुती उपाय

स्वच्छता राखा

खरकटी भांडी आणि अन्नकण पडलेल्या सिंकजवळ अनेक झुरळं फिरतात. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. सायंकाळीच भांडी घासून ठेवा. किचन सिंक आणि ओटा पुसून घ्या. कोपऱ्यांमध्ये जेथे अन्नाचे कण जमा झालेले असतील, ते घासून पुसून स्वच्छ करा.

शाळेत जाताना भीतीपोटी मुल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील - अभ्यासही करतील

सील क्रॅक भरा

झुरळ अगदी लहान छिद्रातूनही आत प्रवेश करू शकतात. त्यामुळे भेगा किंवा खड्डे सील करा. खिडक्या, दारे आणि पाईप्सच्या भोवतालच्या भेगा भरा. सिंक आणि उपकरणांच्या आसपासच्या भागात विशेष लक्ष द्या, जेथे झुरळे सहसा लपतात. नेहमी उपकरणांची जागा स्वच्छ ठेवा.

झुरळांना पळवून लावणारा उपाय

तमालपत्र

तमालपत्राचा वापर आपण झुरळांना पळवून लावण्यासाठी करू शकता. यासाठी आपल्याला तमालपत्र फक्त ड्रॉवर आणि इतर ठिकाणी ठेवायचं आहे. जिथे झुरळं लपण्याची जास्त शक्यता वाटते, तेथे तमालपत्र ठेवा. तमालपत्राच्या उग्र गंधामुळे झुरळं किचनमध्ये फिरकणार नाही.

सकाळी पोट डब्ब - नीट साफही होत नाही? रात्री ५ डाळी चुकूनही खाऊ नका; दिवसभर राहाल अस्वस्थ आणि..

लवंग

लवंगाचा गंध खूप तीव्र असतो. त्यामुळे कीटक त्याच्या जवळ येणे टाळतात. अशा स्थितीत आपण झुरळांची दहशत कमी करण्यासाठी लवंगाचा वापर करू शकता. यासाठी फक्त झुरळांच्या ठिकाणांजवळ काही लवंगा ठेवाव्या लागतील. यामुळे त्या जागेवर पुन्हा झुरळं फिरकणार नाही.

Web Title: 2 Natural Ways to Get Rid of Cockroaches Permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.