lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर

दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर

2 Home Remedies on How to Get Rid of Lizards Effectively : घरात पाली नकोय? मग लसणाचा एक सोपा-सिंपल उपाय करून पाहाच, दुसऱ्या दिवशी पाली घरात दिसणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2023 05:10 PM2023-11-05T17:10:56+5:302023-11-05T17:12:32+5:30

2 Home Remedies on How to Get Rid of Lizards Effectively : घरात पाली नकोय? मग लसणाचा एक सोपा-सिंपल उपाय करून पाहाच, दुसऱ्या दिवशी पाली घरात दिसणार नाही..

2 Home Remedies on How to Get Rid of Lizards Effectively | दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर

दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर

आपल्याला नेहमी वाटतं की आपलं घर हे निटनेटकं स्वच्छ राहावं. काही दिवसांवर दिवाळी या सणाला सुरुवात होईल. दिवाळीच्या सणाआधी प्रत्येक घरात साफसफाई होते. यावेळी घरातील जाळे, धूळ, भिंतींवरील चिकटपणा, घरातील इतर साहित्य साफ केले जाते. साफसफाई करताना किडे, कॉकरोच, पालींना देखील आपण पळवून लावतो. पण पाली काही केल्यास आपलं घर सोडत नाही. अशा वेळी त्यांना पळवून लावण्यासाठी काय करावं सुचत नाही.

पालींना पळवून लावताना ती अंगावर पडेल की काय, याचीही भीती आपल्याला वाटतेच. घरातून पालींना पळवून लावायचं असेल तर, घरगुती लसणाचा स्प्रे तयार करून पाहा. आता तुम्ही म्हणाल लसणाचा वापर फक्त जेवणात होतो. पण असे नाही, याचा वापर आपण पालींना पळवून लावण्यासाठीही करू शकता. ते कसे पाहा(2 Home Remedies on How to Get Rid of Lizards Effectively).

पालींना पळवून लावण्यासाठी लसणाचा खास उपाय

सर्वप्रथम, लसूण सालीसहित ठेचून घ्या. ठेचलेला लसूण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. त्यानंतर त्यात पाणी भरून, बॉटल शेक करा. अशा प्रकारे पालींना पळवून लावण्यासाठी लसणाचा स्प्रे रेडी.

दिवाळीच्या साफसफाईत झुरळांचा बंदोबस्त करा, ४ सोप्या टिप्स- झुरळं होतील घरातून गायब

आपल्याला असे वाटत घरातील विशिष्ट ठिकाणी पाली वारंवार फिरत असतील, तर त्या ठिकाणी तयार स्प्रे शिंपडा. लसणाच्या उग्र वासामुळे काही दिवसात पाली पळून जातील. आपण त्याऐवजी घरातील कोपऱ्यांमध्ये कांदा-लसणाच्या पाकळ्या ठेऊ शकता. यामुळे पाली पळून जातील.

वॉटर हिटर रॉडवर पांढरा थर जमा झालाय? वेळीच साफ करा, अन्यथा वाढेल वीज बिल, पाहा रॉड स्वच्छ करण्याची २ सोप्या ट्रिक्स

काळी मिरी पूड स्प्रे

पालींना पळवून लावण्यासाठी आपण काळी मिरी पावडरचा स्प्रे तयार करू शकता. काळी मिरी हा एक घटक आहे, ज्याचा पालींना त्रास होतो. यामुळे पालींना एलर्जी निर्माण होते. ज्यामुळे ते घर सोडून पळून जातात. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा, त्यात काळी मिरी पूड भरून शेक करा. ज्या ठिकाणी पाली आहेत, त्या ठिकाणी स्प्रे करा. आपण काळी मिरी पावडर ऐवजी लाल तिखटाचा देखील वापर करू शकता.

Web Title: 2 Home Remedies on How to Get Rid of Lizards Effectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.