Join us

९ वर्षाच्या मुलीच्या पोटातून निघाले दिड किलो केस! हा आजार आहे की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2025 18:32 IST

1.5 kg of hair came out of a 9-year-old girl's stomach! : या आजाराला म्हणतात ट्राइकोटिलोमेनिया, काय असतात उपचार-वाचा

लहान मुलांना काही ना काही चावत राहायची सवय असते. आपण लहान होतो तेव्हा आपणही या सवयीचा शिकार झालो होतो. लहान मुलं मातीचा वास आवडतो म्हणून माती खातात. पाटीवरची पेन्सिल खाण्याची सवय तर अनेकांना असते.(1.5 kg of hair came out of a 9-year-old girl's stomach! ) काही जणांना नखं चावायची सवय असते. नखं खाण्याची सवय असते. त्याचप्रमाणे केस चावणारी मुलं सुद्धा असतात. केस खाणे ही सवय नाही तर तो आजार आहे.  (1.5 kg of hair came out of a 9-year-old girl's stomach! )

मुजफ्फरपुर मध्ये राहणार्‍या एका ९ वर्षीय मुलीला १५ दिवसापासून जेवणंच जात नव्हते. भूक लागतचं नव्हती. लहान मुलीची नाटकं असतील म्हणून घरच्यांनी दुर्लक्ष केले. मात्र नंतर तिला उलट्या व्हायला लागल्या. तिच्या पोटात दुखायला लागले. काहीही खायचा प्रसत्न केला की उलटून पडायचे. मग मात्र घरच्यांनी दवाखाना गाठला. डॉक्टरांचे कोणतेही उपाय काम करत नव्हते. म्हणून मग सोनोग्राफी केली.(1.5 kg of hair came out of a 9-year-old girl's stomach! )

 सोनोग्राफीमध्ये जे दिसले ते पाहून त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना बोलावून घेतले.    डॉक्टरांना दिसले की त्या मुलीच्या पोटात भरपूर केस आहेत. केस दिसल्यावर मात्र लगेच ऑपरेशन करण्यात आले. डॉ. आशुतोष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन करू पोटातून केसांचा गोळा काढण्यात आला. किमान दिड किलो केस पोटात होते. मुलीच्या सवयी विचारल्यावर कळले की तिला केस खायची सवय आहे. तिची हीच सवय तिला फार महाग पडली. आता ती मुलगी अगदी व्यवस्थित आहे. डॉक्टरांचे ऑपरेशन यशस्वी ठरले.

 डॉक्टरांनी सांगितले की, तिला ट्राइकोटिलोमेनिया नावाच मानसिक आजार आहे. त्या मुलीवर आता मानसोपचार सुरू आहेत. या आजारात रूग्ण केसं खातो. त्याच्या नकळत तो केस खातो. मुद्दाम असं करत नाही. ती मुलगी गेली सात वर्षे केस खात होती. हळूहळू ते केस पोटात साठत गेले. त्या मुलीवर आता मानसोपचार सुरू आहेत. केस खाण्याची सवय साधी नाही तो आजार आहे. असे आजार लहान वाटले तरी परिणाम वाईट होऊ शकतात.   

टॅग्स :आरोग्यसोशल व्हायरलवैद्यकीयमानसिक आरोग्य