Join us

अफलातून! अवघ्या १० सेकंदात साडी नेसण्याची सोपी पद्धत; Video पाहून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:13 IST

सोशल मीडियावर साडी नेसण्यासाठी अनेक ट्युटोरियल्स आणि हॅक्स पाहायला मिळतात.

मोठे मोठे फॅशन डिझायनर देखील साडीला सर्वात ग्लॅमरस आऊटफिट मानतात, विशेषतः जर ती नीट परिधान केली असेल. सोशल मीडियावर साडी नेसण्यासाठी अनेक ट्युटोरियल्स आणि हॅक्स पाहायला मिळतात. पण आता साडी नेसण्याची एक मनोरंजक निन्जा टेक्निक मार्केटमध्ये आली आहे. झिप साडीचा वापर करून तुम्ही अवघ्या १० सेकंदात साडी नेसू शकता असा दावा आता केला जात आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, झिप साडी म्हणजे काय? महिलांना साडी नेसण्याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण झिप असलेल्या 'रेडी टू वेअर' साड्याही बाजारात आल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला दहा सेकंदात झिप केलेली साडी नेसून तयार होते. साडीचं रूपांतर 'रेडी टू वेअर' आउटफिटमध्ये कसं झालं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. यात साडी आणि ब्लाउज जोडलेले आहेत आणि वर एक झिप दिली आहे.

झिप लावल्यानंतर, तुम्हाला फक्त पदर घेऊन तो खांद्यावर लावावा लागतो आणि अशा प्रकारे साडी नेसली जाते. व्हिडिओमध्ये महिला अवघ्या काही सेकंदात संपूर्ण साडी नेसलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सना असा प्रश्न पडतो की, साडी नेसण्याचे असे प्रकार खरोखरच बाजारात येऊ लागले आहेत का? हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @HasnaZaruriHai इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल की, या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर शेकडो युजर्सनी आपलं मत व्यक्त केलं आहे. अनेकांनी हे झटपट साडी नेसण्यासाठी एक चांगला पर्याय असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी स्वत:च साडी नेसा ती आणखी सुंदर दिसते असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके