उन्हाळा सुरू झाला की उकाड्यामुळे जीव अक्षरश: नकोसा होऊन जातो. दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका एवढा जास्त असतो की घराबाहेर पडण्याचीही सोय नसते. एवढंच काय तर घरात बसूनही घाम घाम होऊन जातं. कारण दुपारी तर पंख्याची सुद्धा गरम हवा येते. शिवाय उष्णतेमुळे रात्रीची झोपही शांत होत नाही. अशावेळी बहुतांश लोक एसी खरेदीकडे वळतात. या उन्हाळ्यात आता तुमचाही एसी खरेदी करण्याचा विचार असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी आधी तपासून घ्या आणि मगच एसी खरेदी करा. नाहीतर पैसा तर जातोच, पण हवं तसं समाधानही मिळत नाही.(Shopping Tips For buying Air Conditioner)
AC खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या?
१. ऑनलाईन शॉपिंग साईटवरून एसी खरेदी करणार असाल तर केवळ रेटिंगवर जाऊ नका. रेटिंग सोबतच ग्राहकांचे रिव्ह्यू देखील वाचा. त्यातून ग्राहकांचे खरे अनुभव कळण्यास खूप मदत होते. त्यामुळे रिव्ह्यू आणि रेटिंग या दोन्ही गोष्टी व्यवस्थित तपासा.
रामनवमी २०२६: नैवेद्यासाठी करा पारंपरिक पंजिरी, पाहा परफेक्ट प्रमाण-अप्रतिम चवीची पंजिरी खा मनोभावे
२. ऑनलाईन शॉपिंग साईट असो किंवा दुकान असो.. हल्ली खूप मोठा डिस्काऊंट बऱ्याच वस्तूंवर देण्यात येतो. या डिस्काऊंटला भुलून जाऊ नका. कारण बऱ्याचदा यामध्ये ज्या वस्तू विक्रीला जात नाहीत त्या खपविण्यासाठी डिस्काऊंटचं नाव देऊन ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.
३. हल्ली यु ट्यूब किंवा इंस्टाग्राम अशा सोशल साईट्सवर वेगवेगळ्या वस्तूंचे खरेखुरे रिव्ह्यू असतात. ग्राहकांनीच ते दिलेले असतात. तुम्हाला जो एसी घ्यायचा आहे त्याचे असे सोशल साईट्सवरचे व्हिडिओही पाहा. त्यातूनही बऱ्याच गोष्टींचा अंदाज यायला मदत होते.
५ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा- केस गळणं, तुटणं कमी होईल- मुळं पक्की होऊन केस वाढतीलही पटकन
४. तुम्ही घेत आहात ते एसी किती स्टार आहे हे तपासून घ्या. जेवढे जास्त स्टार असतील तेवढी वीज कमी लागते. त्यामुळे वीजबिलात पुढे कित्येक रुपये घालविण्यापेक्षा एसी खरेदी करतानाच थोडे जास्त पैसे दिलेलं परवडतं.
