lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > साेनम कपूरच्या एक वर्षाच्या बाळाच्या बुटांची किंमत ४२०००! एवढे महाग, त्यात असं खास काय?

साेनम कपूरच्या एक वर्षाच्या बाळाच्या बुटांची किंमत ४२०००! एवढे महाग, त्यात असं खास काय?

Vayu Kapoor Ahuja's Shoes Worth Rs. 42K: अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचा मुलगा वायू (Sonam Kapoor and Anand Ahuja's Son) नुकताच १ वर्षाचा झाला असून त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त हे खास गिफ्ट मिळालं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 01:18 PM2023-08-25T13:18:20+5:302023-08-25T13:19:26+5:30

Vayu Kapoor Ahuja's Shoes Worth Rs. 42K: अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचा मुलगा वायू (Sonam Kapoor and Anand Ahuja's Son) नुकताच १ वर्षाचा झाला असून त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त हे खास गिफ्ट मिळालं आहे.

Sonam Kapoor and Anand Ahuja's Son Vayu Receives Nike Shoes on his first birthday Worth Rs. 42K | साेनम कपूरच्या एक वर्षाच्या बाळाच्या बुटांची किंमत ४२०००! एवढे महाग, त्यात असं खास काय?

साेनम कपूरच्या एक वर्षाच्या बाळाच्या बुटांची किंमत ४२०००! एवढे महाग, त्यात असं खास काय?

Highlightsहे महागडे बुटं त्याला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मिळाले असून त्यांची किंमत चक्क ४२ हजार रुपये आहे

बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि उद्याजक आनंद अहुजा (Sonam Kapoor and Anand Ahuja) यांचं २०१८ साली लग्न झालं. त्या दोघांना मागच्याच वर्षी पुत्ररत्न झालं. त्यांचा मुलगा वायू ( Vayu) हा नुकताच एक वर्षाचा झाला असून त्याच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अगदी साध्या पद्धतीने घरी पूजा करून त्यांनी बाळाचा वाढदिवस (first birthday) साजरा केला. आता त्या वाढदिवसापेक्षाही जास्त चर्चा होते आहे ती वायुला मिळालेल्या महागड्या बुटांची. हे महागडे बुटं त्याला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मिळाले असून त्यांची किंमत चक्क ४२ हजार रुपये आहे (Vayu Receives Nike Shoes on his first birthday Worth Rs. 42K). बाळाचे बाबा आनंद अहुजा यांनी त्या बुटांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

 

महागड्या बुटांची खासियत
आनंद अहुजा यांनी बुटांचे जे फोटो शेअर केले आहेत ते Nike या प्रसिद्ध ब्रॅण्डचे असून Kobe Bryant या नावाने ते ओळखले जातात. त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या परिचितांनी ते पाठवलेले आहेत, असं या पोस्टवरून दिसून येतं.

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

५११ डॉलर्स एवढी किंमत असणाऱ्या या बुटांची भारतीय चलनानुसार ४२, २०६ रुपये एवढी किंमत येते. निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या या बुटांची खासियत अशी सांगण्यात येते की कोणत्याही ऋतुमध्ये ते त्वचेसाठी योग्य ठरतात. या बुटांचा तळवा रबरी असून हिल्स पुर्णपणे फ्लॅट आहेत. 

 

बुट पाहून अशीही चर्चा रंगली आहे....
आनंद अहुजाने जे फोटो शेअर केले आहेत, त्यात ते महागडे बूट, बाळाचे पाय आणि सोनम कपूरचे हात दिसत आहेत. ते हात सोनम कपूरचेच असावेत, असं वाटतं. तर त्या हातांची नखे खूप जास्त लांब आहेत.

भोपळ्याचे करा खमंग अप्पे, भोपळ्याची नावडती भाजीही होईल आवडती, मुलांच्या डब्यासाठी चविष्ट पदार्थ

ती लांब नखं त्या बाळाच्या कोवळ्या पायांना इजा पोहोचवू शकतात, असं काही जणांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर बाळाच्या पायात बांधलेला काळा दोरा जरा जास्तच घट्ट झाला आहे, तो बदलावा, अशी सूचनाही काही जणांनी दिली आहे. बुटांसोबतच रंगलेली ही चर्चाही चांगलीच रंजक आहे. 


 

Web Title: Sonam Kapoor and Anand Ahuja's Son Vayu Receives Nike Shoes on his first birthday Worth Rs. 42K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.