पांढरीशुभ्र, मऊसूत. सॉफ्ट 'इडली' खायला सगळ्यांनाचं आवडते. 'इडली' हा असा पदार्थ आहे की आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ (Silicone Idli Liners) शकतो. इडली तयार करायची म्हटलं की खूप मोठा घाट घालावा लागतो. सर्वात आधी डाळ - तांदूळ भिजवावे लागतात त्यानंतर पीठ वाटून मग ते आंबवून घ्यावे लागते. त्यानंतर इडली पात्रात हे पीठ ओतून इडल्या करायच्या अशी खूप मोठी पद्धत असते( How To Use Silicone Idli Mould).
इडल्या करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या घरात एक कॉमन ३ ते ४ थराचे स्टील किंवा अॅल्युमिनियमचे इडली पात्र असतेच. या इडली पात्रात आपण इडलीचे तयार पीठ ओतून इडल्या वाफवून घेतो. परंतु बरेचदा, इडली पात्राला या इडल्या चिकटून बसतात. इडल्या इडली पात्रांतून काढताना त्या भांड्याच्या तळाशी चिकटून बसतात, त्यामुळे त्या काढताना तुटतात किंवा कुस्करल्या जातात. यामुळे इडलीचा आकार परफेक्ट गोलाकार असा येत नाही. अशावेळी आपण इडल्या करण्यासाठी घेतलेले कष्ट वाया गेले असेच वाटते. असे होऊ नये यासाठी आपण इडली लायनरचा वापर करु शकतो. इडली लायनरच्या मदतीने इडली पात्रातून इडली आपण अगदी सहज पद्धतीने काढू शकतो. यामुळे इडली तुटली किंवा कुस्करली जात नाही.
इडली लायनर म्हणजे काय ?
'इडली लायनर' हे सिलिकॉन मटेरियलचे गोलाकार वाटीसारखे छोटे भांड असते. हे 'इडली लायनर' आपण इडली पात्रात ठेवून मग त्यावर इडलीचे बॅटर ओतून इडल्या वाफवल्या तर त्या इडली पात्राला चिकटत नाहीत. याचबरोबर इडली पात्रातून इडल्या काढताना काहीवेळा त्या तुटतात - कुस्करुन त्याचा भुगा देखील होतो.
'पीठ चाळण्याचे' काम होईल मिनिटभरात! फक्त २५० रुपयांत आणा हा मग, ओटा आवरण्याची झंझटच नाही...
परंतु आपण जर या 'इडली लायनर' चा वापर केला तर अगदी परफेक्ट गोलाकार इडली न तुटता इडली पात्रातून काढू शकतो. हे इडली लायनर वजनाने अगदी हलके असते यासोबतच त्याची स्वच्छता करणे देखील सोपे असते.
इडल्या तयार करताना आपण शक्यतो इडली पात्रातील प्रत्येक स्टँडच्या तळाशी तेल लावून ग्रीस करतो. जेणेकरुन इडल्या तळाशी चिकटून राहू नयेत. परंतु इडली लायनर वापरताना या स्टँडमध्ये इडली लायनर ठेवून मग त्यात इडलीचे बॅटर ओतावे. त्यानंतर असे स्टँड नेहमीप्रमाणे वाफवून घेण्यासाठी गॅसवर ठेवून द्यावे. इडल्या तयार झाल्यावर या इडली लायनरच्या तळाशी हलकेच दाब देत त्यातून तयार इडल्या काढून घ्याव्यात.
आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...
यात विशेष असे काय ?
१. इडली लायनर हे हाय क्वालिटी फूड ग्रेड सिलिकॉन मटेरियलपासून तयार केले असल्याने आपण स्वयंपाक करण्यासाठी याचा वापर करु शकतो.
२. याचा वापर केल्याने इडली इडली पात्रातून न तुटता अगदी परफेक्ट गोलाकार आकारात काढता येणे शक्य होते. यामुळे इडली पात्राला तेल लावण्याची गरज भासत नाही.
३. इडलीचे बॅटर वाफवून इडल्या तयार करताना ते फसफसून बाहेर येत नाही, त्यामुळे इडली बॅटर वाया जात नाही.
४. ओव्हन, मायक्रोव्हेव किंवा फ्रिज कशातही आपण हे इडली लायनर ठेवू शकतो.
किंमत आणि रेटिंग...
हे इडली लायनर आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या इडली लायनरला ४.० इतके रेटिंग देण्यांत आले. तसेच आत्तापर्यंत ८०० पेक्षा जास्त लोकांनी हे विकत देखील घेतले आहे. हे इडली लायनर आपल्याला ४१० रुपयांपर्यंत सहज विकत मिळते.असे हे इडली लायनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/4hxMIq9