Lokmat Sakhi >Shopping > नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का?

नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का?

Shopping : Product Review : Stainless Steel Coconut Breaker Plate : Coconut Breaker Kitchen Use : How To Use Coconut Breaker Plate : कठीण नारळ फोडायचे अवघड काम होईल सहजसोपे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 14:36 IST2025-06-15T07:21:52+5:302025-06-15T14:36:45+5:30

Shopping : Product Review : Stainless Steel Coconut Breaker Plate : Coconut Breaker Kitchen Use : How To Use Coconut Breaker Plate : कठीण नारळ फोडायचे अवघड काम होईल सहजसोपे...

Shopping Product Review Stainless Steel Coconut Breaker Plate Coconut Breaker Kitchen Use How To Use Coconut Breaker Plate | नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का?

नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का?

रोजच्या जेवणात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी आपण खोबऱ्याचा वापर करतोच. खोबरं म्हटलं की नारळ फोडणे ओघाने आलेच. आपल्यापैकी अनेक गृहिणींना नारळ फोडणे म्हणजे फारच अवघड आणि टेंन्शनचे काम वाटते. नारळ फोडायचा (Stainless Steel Coconut Breaker Plate) असेल तर आपण किचन मधील अनेक वजनदार (Coconut Breaker Kitchen Use) वस्तूंचा वापर करतो. हा कठीण नारळ फोडण्यासाठी आपण तो बरेचदा ओट्यावर आपटतो किंवा लाटणं, खलबत्ता जे काही मिळेल त्याने फोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा नारळ कठीण असल्याने सहजासहजी फोडणे काहीवेळा शक्य होत नाही. नारळाचे कठीण कवच सहज आणि सुरक्षितपणे फोडण्यासाठी नेहमीच कष्ट व वेळ लागतो(How To Use Coconut Breaker Plate).

नारळ फोडताना अनेकदा आपल्या हाताला देखील इजा होण्याची शक्यता असते. यासाठीच, असे होऊ नये म्हणून बाजारात विविध प्रकारची नारळ फोडण्याची उपकरणे उपलब्ध झाली आहेत, जी या कामाला सोपे, जलद आणि कोणत्याही काटकटीशिवाय अगदी सहजसोपे बनवतात. या उपकरणांमुळे नारळ फुटून हाताला इजा न होता आणि अवघड मेहनत न घेता सहज फोडता येतो. नारळ फोडण्यासाठी काही उपयुक्त आणि नारळ फोडणाऱ्या नव्या प्रकारच्या उपकरणाची माहिती घेऊयात.  

नारळ फोडण्याचे किचकट काम होईल सहजसोपे... 

नारळ फुटून हाताला इजा न होता आणि अवघड मेहनत न घेता सहज फोडता येण्यासाठी 'कोकोनट ब्रेकर प्लेट' या छोट्याशा उपकरणाचा वापर केला जातो. ही 'कोकोनट ब्रेकर प्लेट' स्टीलपासून तयार केली जाते. हे उपकरणं म्हणजे एक छोटी स्टीलची डिश असते, ज्याच्या बरोबर मधोमध एक धारदार सूरीप्रमाणेच पात असतं. या पात्यावर आपण नारळ जोरात आपटला की तो चक्क अगदी मिनिटभरात फुटतो. तसेच फुटलेल्या नारळातील पाणी बाहेर पडून वाया न जाता त्या खाली असलेल्या स्टीलच्या डिशमध्ये स्टोअर केले जाते.

किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

 

यामुळे नारळ पटकन फोडून होतो तसेच नारळ फुटल्यावर त्यातील पाणी बाहेर पडून वाया देखील जात नाही. या 'कोकोनट ब्रेकर प्लेट' च्या मदतीने नारळ फोडल्यास तो सहज फुटला जाऊन हाताला इजा देखील होत नाही. 'कोकोनट ब्रेकर प्लेट'च्या मदतीने आपण हे अवघड काम अगदी पटकन करु शकतो. या प्लेटच्या मध्यभागी असणाऱ्या धारदार पात्याने नारळ सहज फुटला जाऊन त्याचे दोन भागात विभाजन होते. 

विसरा ती लेगिन्सची जुनी फॅशन! कुर्त्याचा लूकच बदलून टाकणारे ७ प्रकार-क्लासी आणि स्टायलिश...

किंमत आणि रेटिंग... 

ही 'कोकोनट ब्रेकर प्लेट' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'कोकोनट ब्रेकर प्लेट' ला ३.४ स्टार इतके  रेटिंग देण्यांत आले आहे, तर आत्तापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांनी ही 'कोकोनट ब्रेकर प्लेट' विकत घेतली आहे. या 'कोकोनट ब्रेकर प्लेट'ची किंमत २१५ रुपये इतकी आहे. अशी ही 'कोकोनट ब्रेकर प्लेट' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://amzn.to/44hs8WI

Web Title: Shopping Product Review Stainless Steel Coconut Breaker Plate Coconut Breaker Kitchen Use How To Use Coconut Breaker Plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.