Lokmat Sakhi >Shopping > पोळ्या लाटण्याची-भाजण्याची कटकटच नाही, कणकेचा गोळा ठेवताच भराभर पोळ्या करणारं पाहा ‘हे’ मशिन

पोळ्या लाटण्याची-भाजण्याची कटकटच नाही, कणकेचा गोळा ठेवताच भराभर पोळ्या करणारं पाहा ‘हे’ मशिन

Product Review For Longway Automatic Electric Roti Maker: पोळ्या करणं खूपच अवघड, वेळखाऊ वाटत असेल तर भराभर पोळ्या करण्याची ही ट्रिक तुम्ही एकदा पाहायलाच हवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 16:16 IST2025-02-28T15:36:07+5:302025-02-28T16:16:49+5:30

Product Review For Longway Automatic Electric Roti Maker: पोळ्या करणं खूपच अवघड, वेळखाऊ वाटत असेल तर भराभर पोळ्या करण्याची ही ट्रिक तुम्ही एकदा पाहायलाच हवी..

Product Review For Longway Automatic Electric Roti Maker, most simple method of making chapati, best trick for making chapati or roti quickly | पोळ्या लाटण्याची-भाजण्याची कटकटच नाही, कणकेचा गोळा ठेवताच भराभर पोळ्या करणारं पाहा ‘हे’ मशिन

पोळ्या लाटण्याची-भाजण्याची कटकटच नाही, कणकेचा गोळा ठेवताच भराभर पोळ्या करणारं पाहा ‘हे’ मशिन

Highlightsया मशिनचा आकार लहान आहे. त्यामुळे ते घेऊन घरात ठेवायचं कुठे अशी अडचण येत नाही. तुमचं स्वयंपाक घर छोटं असलं तरी त्यात ते व्यवस्थित सामावून जाईल.

आपल्या रोजच्या जेवणात एकवेळ भात, भाजी, वरण, चटणी असे पदार्थ नसतील तरी चालते. पण पोळ्या मात्र पाहिजेतच.. कारण पोळी खाल्ल्याशिवाय अनेकांचं पोट भरतच नाही. आणि महिलांची नेमकी इथेच पंचाईत होते. सगळा स्वयंपाक एकीकडे आणि पोळ्यांचं काम एकीकडे.. कारण पोळ्या करण्यासाठी कणिक भिजवायला, पोळ्या लाटायला त्या भाजायला जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळात तर स्वयंपाकाचं बाकीचं सगळं काम होऊन जातं.  पोळ्या करायला बाई लावणंही अनेकांना परवडणारं नसतं. शिवाय त्या बाईंनी केलेल्या पोळ्या घरातल्या सगळ्यांना आवडतीलच असं नाही. त्यामुळेच आता तुमची मेहनत कमी करण्यासाठी झटपट पोळ्या करणारं हे मशिन घेऊन या.. बघा हे मशिन नेमकं कसं आहे आणि ते कुठून घ्यायचं..(Product Review For Longway Automatic Electric Roti Maker)

 

Longway Automatic Electric Roti Maker

१. या मशिनचं एक सगळ्यात छान वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही कणकेचा गोळा ठेवून फक्त दाबायचं आहे. त्यानंतर त्याची आपोआप गोलाकार पोळी तयार होते आणि विशेष म्हणजे त्यात ती भाजूनही निघते.

२. विजेवर चालणारं हे मशिन बाहेरगावी न्यायलाही अतिशय सोपं आहे कारण वजनाने ते कमी आहे. 

गूळ घालताच चहा फाटतो? बघा खास रेसिपी, चहा अजिबात नासणार नाही- होईल फक्कड

३. शिक्षण, नोकरी यानिमित्त अनेकजण घरसोडून दुसऱ्या गावी राहात असतात. त्यांचे बऱ्याचदा जेवणाचे खूप हाल होतात. अशा लोकांसाठीही हे रोटी मेकर मशिन अतिशय उपयुक्त ठरणारं आहे.

४. या रोटी मेकरचा पृष्ठभाग नॉसस्टीक असल्याने त्याला कणिक चिटकून बसत नाही. त्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठीही अतिशय सोपं आहे.

लग्नसराई स्पेशल: मेहेंदी, हळद कार्यक्रमांत घाला पटियाला सूट- करा बॉलीवूड अभिनेत्रींसारखा 'देसी लूक'

५. या मशिनचा आकार लहान आहे. त्यामुळे ते घेऊन घरात ठेवायचं कुठे अशी अडचण येत नाही. तुमचं स्वयंपाक घर छोटं असलं तरी त्यात ते व्यवस्थित सामावून जाईल.

६. या रोटी मेकर मशिनमध्ये तापमान कंट्रोल करण्याची एक व्यवस्था आहे. त्यामुळे त्यात पोळ्या जळत नाहीत.

किंमत आणि रेटिंग

हे मशिन सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर १९९९ रुपयांना मिळत असून त्याला ग्राहकांकडून ४.१ स्टार मिळाले आहेत. 

Click To Buy:https://amzn.to/4idQzbC

 

Web Title: Product Review For Longway Automatic Electric Roti Maker, most simple method of making chapati, best trick for making chapati or roti quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.