Join us

Navratri 2021 : नवरात्रीच्या ९ दिवसात ‘या’ वस्तूंची खरेदी करणं मानलं जातं शुभ; एका क्लिकवर मिळवा वस्तूंची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:44 IST

Navratri 2021 : आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी, चांदीचे कोणतेही शुभ साहित्य आणा आणि देवीला अर्पण करा.

जे लोक श्राद्ध पितृपक्षात खरेदी करणे टाळतात, ते नवरात्रीच्या ९ दिवसात जोरदार खरेदी करतात. पंचागानुसार नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आणि या ९ दिवसात काही वस्तूंची खरेदी करणं योग्य मानलं जातं.  नवरात्रीत केले जाणारे अनेक उपाय ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत. जे केल्यास तुमच्या समस्या नक्कीच कमी होऊ शकतील.

आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी, चांदीचे कोणतेही शुभ साहित्य आणा आणि देवीला अर्पण करा. जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कधीही गाईचे तूप आणू शकता. जर तुम्हाला घर हवे असेल तर लहान मातीचे घर आणा आणि ते पूजेच्या ठिकाणी ठेवा.

जमीन किंवा  इतर संपत्ती

अनेकजण जमीन किंवा नवीन घर नवरात्रीच्या दिवसात खरेदी करतात. ज्याेतिष आणि वास्तूशास्रानुसार हे शुभ मानलं जातं. सूर्य अग्नी, शिव वायू, गणपती जल, विष्णू आकाश आणि देवी दुर्गा भूमीची देवी आहे. नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे पूजा जाते आणि अशात घर किंवा जमीन विकत घेतल्यास लाभदायक ठरतं. 

देवीची प्रतिमा

घरांमध्ये नेहमी सुख-शांती आणि धन सुबत्ता कायम राहावी अशी इच्छा असल्यास तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीचा फोटो घरी आणावा आणि देवघरात ठेवावा. या फोटोत देवी कमळावर बसलेली आणि तिच्या हातातून धनाची वर्षा होत असावी.

मोरपिस

मोरपिस पाहताचक्षणी मन प्रसन्न होतं. देवीच्या सरस्वती रूपातील वाहन मोर आहे. म्हणूनच मोराच्या पंखाला शुभ मानले जाते. जर तुम्ही नवरात्रीत मोरपिस घरी आणलं आणि घरात लावल्यास लाभ होतो. मोरपिस ईशान्य दिशेला ठेवल्याने सुख मिळतं आणि घरामध्ये सकारात्मक उर्जा कायम राहते.

धागा

हातात बांधण्याचा धागा घेणंसुद्धा पवित्र मानलं जातं. असा समज आहे की, हा धागा बांधल्याने तुम्हाला भगवान ब्रह्मा, विष्णू व महेश आणि तीन देवी लक्ष्मी, पार्वती व सरस्वतीची कृपा प्राप्त होते. यामुळे तुमचं रक्षण होतं आणि रखडलेली कामं मार्गी लागतात. एखाद्या पुजेला उपस्थित राहून तुम्ही ब्राम्हणांकडून असा धागा बांधून घेऊ शकता किंवा  धाग्याची खरेदी करून तुमच्या इच्छा मनात धरून नऊ गाठी बांधा. हा धागा देवीपुढे वाहून मग प्रसाद म्हणून तुम्ही स्वत:कडे ठेवू शकता.

टॅग्स :खरेदीनवरात्री