Join us

पुष्पा सिनेमात समंथा प्रभूने घातलेल्या मिरर वर्क ब्लाऊजचा नवा ट्रेंड, फक्त ५०० रूपयांत सुंदर पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 14:43 IST

Online shopping: पुष्पा चित्रपटातलं 'उ अंतावा उ उ अंतावा' हे आयटम साँग आठवतं.. त्यातलं समंथा प्रभूचं (Samantha Prabhu, Pushparaj movie) निळ्या रंगाचं मिरर  वर्क ब्लाऊज (Mirror work blouse).. सध्या हे ब्लाऊज जबरदस्त ट्रेंडिंग आहे.. म्हणून करून टाका झटपट खरेदी...

ठळक मुद्देहे ब्लाऊज घेण्याचा विचार करत असाल, तर हे काही ऑनलाईन पर्याय नक्की तपासून पहा.. 

पुष्पा चित्रपटातल्या वेगवेगळ्या गोष्टींची सध्या जोरदार चर्चा आहे.. कुणाला त्यातली फायटिंग आवडते,  कुणाला अल्लू अर्जूनची स्टाईल भावते तर कुणी श्रीवल्ली गाण्याचे प्रचंड फॅन झाले आहेत.. त्याचप्रमाणे त्या चित्रपटातली आणखी एक गोष्ट सध्या चांगलीच गाजते आहे.. ते म्हणजे या चित्रपटातल्या 'उ अंतावा उ उ अंतावा' या आयटम साँगमध्ये समंथा प्रभू हिने घातलेल्या मिरर वर्क ब्लाऊजची  (Mirror work blouse).

 

छोटे- छोटे आरसे असणारं हे डार्क निळ्या रंगाचं ब्लाऊज सध्या महिलांमध्ये जबरदस्त हिट झालं आहे.. असं ब्लाऊज कुठे मिळेल, त्याची किंमत काय हे जाणून घेण्यासाठी सध्या अनेक जणी उत्सूक आहेत.. एखाद्या प्लेन शिफॉन साडीवर हे ब्लाऊज घातल्यास तुमचा लूक नक्कीच हटके दिसू शकतो. किंवा हे ब्लाऊज आणि स्कर्ट व ओढणी असा लूकही सध्या सुरू असणाऱ्या लग्न सराईसाठी परफेक्ट ठरू शकतो.. हे ब्लाऊज घेण्याचा विचार करत असाल, तर हे काही ऑनलाईन पर्याय नक्की तपासून पहा.. 

 

१. गुलाबी रंगाचं हे मिररवर्क ब्लाऊज ऑनलाईन पर्यायांमध्ये उपलब्ध असून ब्लाऊजची किंमत अवघी ३८९ रूपये आहे. जांभळ्या, काळ्या, हिरव्या रंगाची प्लेन साडी असेल तर हे ब्लाऊज खूपच उठून दिसेल.. या ब्लाऊजविषयी अधिक माहिती घेण्यासाठी किंवा हे ब्लाऊज खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..

https://www.flipkart.com/radheju-u-neck-women-blouse/p/itm951ea6b2151f5?pid=BLOG79FS3666PTZV&lid=LSTBLOG79FS3666PTZVSXFHBJ&marketplace=FLIPKART&store=clo&srno=b_1_8&otracker=browse&fm=organic&iid=3f79b611-1597-4d73-bd28-e3ecf45a4a1b.BLOG79FS3666PTZV.SEARCH&ppt=dynamic&ppn=productListView&ssid=6x7gfma3e80000001644223501829

 

 

२. meesho या ऑनलाईन साईटवर अतिशय असणारे आणि स्टायलिश लूक देणारे ब्लाऊज अवघ्या २५० ते ३०० रूपयांत उपलब्ध आहेत. हे ब्लाऊज तुम्ही साडीवर तर घालू शकताच, पण जर तुमच्याकडे एखादा लेहेंगा किंवा घागरा असेल तर त्यावरही ओढणी घेऊन तुम्ही हे ब्लाऊज घालू शकता. या ब्लाऊजची खरेदी करायची असेल, तर खालील लिंकवर क्लिक करा. 

https://meesho.com/fancy-mirror-blouse/p/houbi

 

३. काळ्या- निळ्या रंगाचं हे ब्लाऊज तर कोणत्याही साडीवर अतिशय खुलून दिसेल. या ब्लाऊजवर अतिशय दाट आरसे असून हे ब्लाऊज सध्या अवघ्या ४५० रूपयांत खालील ऑनलाईन साईटवर उपलब्ध आहे. हे ब्लाऊज घ्यायचं असेल किंवा त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.amazon.in/Mirror-Work-Blouse-Sleeves-34-40/dp/B09197HW37 

टॅग्स :खरेदीऑनलाइनपुष्पाअल्लू अर्जुन