Lokmat Sakhi >Shopping > दूध वारंवार ऊतू जातं? घरी आणा हे भन्नाट 'मिल्क बॉयलर' दूध ऊतूच जाणार नाही...

दूध वारंवार ऊतू जातं? घरी आणा हे भन्नाट 'मिल्क बॉयलर' दूध ऊतूच जाणार नाही...

Milk boiler cooker with whistle : how to use milk cooker : Milk Cooker : How To Use Milk Cooker : आता दूध तापवताना ते ऊतू जाऊ नये म्हणून ओट्याजवळ उभं राहण्याची गरज नाही, 'मिल्क बॉयलर' करेल तुमचं काम सोपं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 15:44 IST2025-02-27T15:28:07+5:302025-02-27T15:44:14+5:30

Milk boiler cooker with whistle : how to use milk cooker : Milk Cooker : How To Use Milk Cooker : आता दूध तापवताना ते ऊतू जाऊ नये म्हणून ओट्याजवळ उभं राहण्याची गरज नाही, 'मिल्क बॉयलर' करेल तुमचं काम सोपं...

Milk boiler cooker with whistle how to use milk cooker Milk Cooker How To Use Milk Cooker | दूध वारंवार ऊतू जातं? घरी आणा हे भन्नाट 'मिल्क बॉयलर' दूध ऊतूच जाणार नाही...

दूध वारंवार ऊतू जातं? घरी आणा हे भन्नाट 'मिल्क बॉयलर' दूध ऊतूच जाणार नाही...

दूध तापवायला ठेवलं की ते ऊतू जाणं ही तमाम महिलांची एक अगदी कॉमन समस्या आहे. दूध तापवणे हा एका मोठा किचन टास्कच आहे असे म्हणावे लागेल.  दूध तापवत असताना कित्येकदा आपण अगदी बारकाईने लक्ष देऊनही दूध भांड्यातून ऊतू जातं. जेव्हा आपण ओट्यासमोर असतो तेव्हाच आपण (Milk boiler cooker with whistle) साधारणपणे दूध तापवायला ठेवतो. पण तरी एका मिनीटांत (Milk Cooker) हे दूध वेगाने वर येतं आणि ऊतू जातंच. दूध ऊतू गेलं की सगळी गॅस शेगडी, ओटा सगळं खराब होतं आणि मग ते साफ करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच राहत नाही. अशावेळी दूध वाया (how to use milk cooker) तर जातंच पण त्यावरची सायही वाया गेल्याने आपल्याला फार हळहळ वाटते. मग सगळं पातेलं खराब होतं आणि घासताना ते निघता निघत नाही (How To Use Milk Cooker).

एवढंच नाही तर काहीवेळा कामाच्या घाई - गडबडीत दूध गरम करताना ते ऊतू जाऊ नये म्हणून बघत बसण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी काय करावं हे सुचत नाही पण आता टेंन्शन घेऊ नका, कारण आपण खास दूध तापवण्यासाठीचा कुकर म्हणजेच 'मिल्क बॉयलर' असे एक जादुई छोटेसे भांड अगदी स्वस्त दरात विकत घेऊ शकतो. दूध तापवण्यासाठीचे 'मिल्क बॉयलर' म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात. 

मिल्क बॉयलर म्हणजे काय ? 

'मिल्क बॉयलर' म्हणजे थोडक्यात दूध गरम करण्याचा कुकर. हे एक खास करुन दूध तापवण्यासाठीचे वेगळ्या प्रकारचे भांडे असते. यात आपण दूध अगदी सहजपणे तापवू शकतो. हे भांड स्टेनलेसस्टीलचे असते. आपल्या नेहमीच्या भांड्यांप्रमाणेच गोलाकार थोडे उभे, उंच आकारात असते. या भांड्याला बाहेरच्या बाजूने प्रेशर कुकरप्रमाणे एक छोटी शिट्टी असते. जेव्हा आपण यात दूध तापवायला ठेवतो तेव्हा दूध संपूर्णपणे गरम झालयावर कुकरची शिट्टी वाजते. कुकरची शिट्टी वाजली म्हणजे दूध उकळून गरम झाले असे समजावे. या मिल्क बॉयलरला बाहेरच्या बाजूने दोन थर असतात, कुकरची शिट्टी उघडून त्या छिद्रांतून आपण आधी थोडे पाणी आत ओतून घ्यावे. त्यानंतर शिट्टी लावून मगच हा मिल्क बॉयलर गॅसवर ठेवावा. 

फक्त २०० रुपयांची २ इन १ तेलाची बाटली, स्वयंपाकात तेलाचा वापर होईल आपोआप कमी...

इतर वैशिष्ट्ये :- 

१. हे भांड चांगल्या दर्जाच्या स्टेनलेसस्टीलपासून तयार करण्यात आले आहे. 

२. या भांड्याची स्वच्छता करणे अगदी सहजसोपे आहे. नेहमीचा भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड सोपचा वापर करुन आपण हे भांड अगदी सहजपणे स्वच्छ करू शकतो. 

३. हे भांड झाकण्यासाठी त्यावर एक वेगळ्या प्रकारचे झाकण देखील यासोबतच मिळते. 

४. या भांड्याला गंज न लागता ते वर्षानुवर्षे चांगले टिकून राहते. 

५. या भांड्याचा वापर केला तर दूध ऊतू जाण्याची भीतीच राहत नाही. कारण दूध उकळले की, प्रेशर कुकर प्रमाणेच याची शिट्टी वाजते. जेणेकरुन आपल्याला समजते की दूध व्यवस्थित गरम झाले आहे. 

‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...


आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...

किंमत आणि रेटिंग... 

दूध तापवण्यासाठीचे हे 'मिल्क बॉयलर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'मिल्क बॉयलर ला ३.६ इतके रेटिंग देण्यांत आले. हे 'मिल्क बॉयलर' आपल्याला फक्त ६९० रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. असे हे 'मिल्क बॉयलर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/3ESWVim

Web Title: Milk boiler cooker with whistle how to use milk cooker Milk Cooker How To Use Milk Cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.