lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, मिक्सर खरेदी होईल परफेक्ट

दिवाळीत मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, मिक्सर खरेदी होईल परफेक्ट

Keep 3 things in mind while buying mixer in Diwali Shopping tips : खरेदी करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2023 09:48 AM2023-11-03T09:48:34+5:302023-11-03T09:50:02+5:30

Keep 3 things in mind while buying mixer in Diwali Shopping tips : खरेदी करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे...

Keep 3 things in mind while buying mixer in Diwali Shopping tips : Thinking of buying a mixer this Diwali? Remember 3 things, buying a mixer will be easy | दिवाळीत मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, मिक्सर खरेदी होईल परफेक्ट

दिवाळीत मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, मिक्सर खरेदी होईल परफेक्ट

दिवाळी जवळ आली की आपल्या डोक्यात खरेदीचे प्लॅन्स सुरू होतात. यामध्ये कपडे, दागिने यांपासून ते घरातल्या वस्तू, सजावटीच्या गोष्टी, सोनं अशी बरीच मोठी यादी असते. वर्षातून एकदा येणारा हा मोठा सण असल्याने या सणाला आवर्जून खरेदी केली जाते. कधी ऑनलाईन, कधी प्रत्यक्ष बाजारात जाऊन तर कधी एखाद्या प्रदर्शनातून आपण वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करत असतो. दिवाळीच्या दरम्यान कंपन्या आणि दुकानदारही मोठ्या प्रमाणात सेल जाहीर करत असल्याने ग्राहक म्हणून आपण त्याकडे आकर्षित होतो आणि आपल्याला बरेच दिवसांपासून हवी असलेली किंवा घरात खराब झालेली वस्तू खरेदी करतो (Keep 3 things in mind while buying mixer in Diwali Shopping tips) . 

मिक्सर ही आता घरोघरी वापरली जाणारी आणि सतत लागणारी स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची गोष्ट असते. कोणत्याही पदार्थाचे वाटण करण्यासाठी नाहीतर जिन्नस बारीक करण्यासाठी मिक्सरचा सतत वापर केला जातो. वापरुन वापरुन हा मिक्सर खराब होतो आणि त्रास द्यायला लागतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही मिक्सर खरेदीचा प्लॅन करत असाल तर खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. 

(Image : Google )
(Image : Google )

१. कंपनी आणि वॉरंटी पाहा

अनेकदा दिवाळीमध्ये भरपूर ऑफर्स असतात. आपणही अशाप्रकारच्या ऑफर्सना भुलून जातो आणि झटपट खरेदीचे पर्याय पाहतो. स्वस्तात मस्त काहीतरी घेण्याच्या नादात आपण काहीवेळा एखादी गोष्ट कोणत्या कंपनीची आहे त्यावर वॉरंटी किती आहे या गोष्टींकडे पुरेसे लक्ष देत नाही. पण असे करणे आपल्यालाच महागात पडू शकते. त्यामुळे मिक्सरची कंपनी आणि वॉरंटी किती आहे ते तपासा आणि मगच खरेदी करा. 

२. सोय पाहणे जास्त महत्त्वाचे

तंत्रत्रान विकसित झाले त्यानंतर मिक्सर विथ ग्राईंडर, ब्लेंडर असे काही काही प्रकार मिक्सरसोबत यायला लागले. पण आपण हा ग्राईंडर किंवा ब्लेंडर खरंच वापरतो का, आपल्याला त्याचा उपयोग आहे का हे लक्षात घ्या आणि मगच खरेदी करा. नाहीतर जास्तीचे पैसे तर जातातच पण या मोठ्या आकाराच्या मिक्सरची जागा अडते. तसेच यामध्ये झुरळं होऊन साफसफाई करावी लागते ती वेगळीच. त्यामुळे आपली गरज, सोय लक्षात घेऊन त्याप्रमाणेच खरेदी करायला हवी.     

३. खरेदी करताना घाई नको

अनेकदा आपण खरेदीला गेलो की खूप उत्साहात असतो. अशात घाईगडबड होण्याची शक्यता असते. पण मिक्सरची भांडी, वायर, त्याचे मशीन या सगळ्या गोष्टी नीट बारकाईने तपासून घ्यायला हव्यात. त्यामुळे नंतर मिक्सर घरी आणल्यानंतर काहीही अडचण येत नाही. म्हणून खरेजदीच्या वेळी सगळे बारकाईने पाहून मगच खरेदी करा.  

Web Title: Keep 3 things in mind while buying mixer in Diwali Shopping tips : Thinking of buying a mixer this Diwali? Remember 3 things, buying a mixer will be easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.